You are currently viewing गंध मावेना परसात

गंध मावेना परसात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गंध मावेना परसात*

 

बाग बहरता

गंध मावेना परसात

भरून श्वासात

उरलेला………

 

तप्त उन्हाने

अंगी होते काहिली

फुले बहरली

मोग-याची….

 

बहावा गुलमोहर

लाल पिवळा सुंदर

भासतो परिसर

रम्य……..

 

पहाटेस कळ्या

दवबिंदू लेवून उमलती

नाजूक दिसती

वेलीवर……

 

संध्यारंग उजळत

फुलते जाई मधुमालती

सुगंध संगती

घेऊन……

 

पक्षी फुलपाखरे

भुंगे करती गुणगुण

मधमाशा मोहून

फुलांवरती……

 

विविध पानाफुलांनी

अशी बाग बहरते

मन मोहरते

चैतन्याने……

🌹🦋🪷🌹🦋🪷🌹

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा