*G-20 शिखर परिषदे अंतर्गत होणाऱ्या स्वच्छता मोहिमेसाठी मालवण शहरातील चिवला बीचला पसंती*
*(स्वच्छता मोहिमेसाठी देशातील ३७ समुद्र किनारे तसेच जगभरातील इतर देशांमधील १९ समुद्र किनाऱ्यांची निवड)*
G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्षवेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ७ ते ९ वाजता स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
G-20 शिखर परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत भारतातील एकूण ३७ किनाऱ्यांसह जगभरातील इतर १९ समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील एकूण चार समुद्र किनाऱ्यांची निवड झालेली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील चिवला समुद्र किनाऱ्याला पसंती देण्यात आलेली आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी चिवला समुद्र किनाऱ्याची झालेली निवड मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
कचऱ्याचा विशेषतः प्लास्टिक कचऱ्याचा समुद्र आणि महासागरावर व येथील जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांकडे जागतिक पातळीवर लक्ष वेधणे तसेच यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांच्या सहभागाने समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी व येथील परीसंस्थेचे जतन करण्यासाठी G-20 देशांमध्ये सामुहिक कृती करणे हे या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे.
मालवण शहरातील चिवला समुद्र किनारा येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मालवण नगर परिषदेने केलेले असून या कार्यक्रमास केंद्र शासनाकडून G-20 परिषदेचे अधिकारी मालवण शहरात उपस्थित राहणार आहेत. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी होणाऱ्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेस सर्व मालवण वासियांना मोठ्याप्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. गतवर्षी २०२२ साली झालेल्या इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे व सहकार्यामुळे मालवण शहराला देशपातळीवर केंद्रशासनाकडून गौरविण्यात आलेले होते.
👩💻🧑💻👩💻👨💻👩💻👨💻👩💻👨💻🧑💻
*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃♀️🏃♂️
*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*
*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*
*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*
*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*
*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*
*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*
*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*
*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*
*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*
🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*
*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*
*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा*
*📲7350219093*
*📲9022686944*
*जाहिरात लिंक*
———————————————-