You are currently viewing नीट परीक्षेत यश कसे मिळवावे या विषयावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये उद्या परिसंवादाचे आयोजन

नीट परीक्षेत यश कसे मिळवावे या विषयावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये उद्या परिसंवादाचे आयोजन

कुडाळ :

परीक्षेत यश कसे मिळवावे या विषयावर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये उद्या दि १९ मे रोजी तज्ज्ञ आदित्य दीपक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कायमच प्रयत्नशील राहिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहावी होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CBSE / State / NIOS माध्यमातून बारावीपर्यंतचे शिक्षण बॅरिस्टर नाथ पै करिअर अकॅडमी अंतर्गत यावर्षीपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. बारावी नंतरच्या उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षणासाठी गरजेच्या परीक्षांची तयारीही कोटा येथील अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करुन घेतली जाते. १६ मे पासून हे वर्ग सुरू करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर बॅ नाथ पै करिअर अकॅडमीने विद्यार्थ्यांसाठी NEET परीक्षेत यश कसे मिळवावे हा ‘परिसंवाद’ आयोजित केला आहे. आदित्य दिपक नाईक, वेतोरा (एमबीबीएस जळगाव प्रथम वर्ष प्रथम सत्र उत्तीर्ण विद्यार्थी) परिसंवादासाठी उपस्थित राहणार आहे. सदर परिसंवाद सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, प्राचार्या शुभांगी लोकरे, उप-प्राचार्या विभा वझे, करिअर अकॅडमी समन्वयक अर्जुन सातोस्कर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा