सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण,कुडाळ,कणकवली तालुक्यात अलीकडे खुलेआम जुगाराच्या मैफिली बसू लागल्या आहेत, भरदिवसा सुद्धा कधी खाकीच्या वरदहस्थाखाली तर कधी राजकीय वरदहस्थाखाली जुगाराच्या मैफिली बसतात. अशीच एक जुगाराची मैफिल कुडाळ येथील कविलकाटेच्या जंगलात राजकीय वरदहस्ताखाली आज सायंकाळी सात वाजता सुरू झाली आहे. कवीलकाटे जंगलातील जुगाराची मैफिल सात वाजता सुरू होऊन पहाटेपर्यंत चालते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावांमध्ये आणि शहरातील काही जंगलमय भागांमध्ये भर दिवसा सुद्धा जुगाराच्या मैफिली बसतात. या जुगाराच्या मैफिलींना खाकी वर्दीतील शिलेदारांचा आशीर्वाद लागतो तर काही जुगार्यांना राजकीय लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे अगदी बिनधास्तपणे जुगारी मैफिली बसवतात आणि या मैफिलींमध्ये राजकीय लोकप्रतिनिधी देखील आपल्या हात धुऊन घेतात. कुडाळ तालुक्यातील कविलकाटे जंगलात अशाच प्रकारची एक जुगाराची मैफिल आज सायंकाळी सात वाजता सुरू झाली असून ती पहाटेपर्यंत चालणार. या जुगाराच्या मैफिलीला राजकीय वरदहस्त लाभल्याने खाकीचे शिलेदार त्या ठिकाणी फिरकत नाहीत. परंतु आपले हात मात्र ओले करून घेतात. त्यामुळे काही गावांमध्ये चालणाऱ्या जुगाराच्या मैफिली बेधडकपणे खुलेआम सुरू असतात आणि या जुगाराच्या आडून तक्षिमदार आपले नशीब फुलवतात तर घरातले दाग दागिने विकून पैसा अडका घेऊन जुगार खेळणारे मात्र बरबाद होतात. गावागावातील युवा पिढी या जुगाराच्या नादात अवैद्य धंद्याकडे आकर्षित होऊन वाम मार्गाला लागते. परंतु जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैद्यपणे सुरू असलेल्या जुगाराच्या धंद्याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी होऊ लागली आहे.