*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*नातं अश्रूंचं…*
मला वाटतं माणसाचं अश्रूंशी नातं जन्मत:च आहे नाही का?
अहो, जन्मत:च टॅह करतो ना माणूस ? म्हणजे रडतच जगात
येतो व रडतच जगाचा निरोप घेतो,म्हणजे झालं ना जन्माचं
नातं..! सर्व प्रकारच्या भावनांचं प्रकटीकरण करण्याचं उत्तम
साधन म्हणजे अश्रूच! माणूस ह्या अश्रूंचा कुठे आणि कसा
आणि किती वापर करेल सांगता येत नाही.कारण माणूस मुळातच बहुरूपीच आहे.जीवनात अनेक भूमिका निभावतो तो!
बालपण किती छान असते हो? मोठ्ठ भोकाड पसरायचं,मग
आई म्हणते, “आसू ना पासू, मरी गई सासू”(सासू मेल्यावर
कोणाला रडू येते हो?) बघा बघा, रडतो आहे पण अश्रू आहेत
का? खोटे रडून आईला ब्लॅकमेल करणे किती छान जमते
मुलांना! पण सगळीच मुले काही सारखी नसतात. काही मुले
मनाने इतकी नाजुक असतात असतात की, जराही रागावले तरी डोळ्यातून लगेच गंगा यमुना सुरू होतात.म्हणजे हृदयाला
लागले की आलेच धावत अश्रू पापणीच्या काठांवर ! ते टपोर
मोती एकामागे एक असे काही ओघळतात की बघणाऱ्याच्या मनात करूणा दाटून आलीच म्हणून समजा! नि ते अश्रू पाहून
आपला ही बांध फुटतो नि मग दोन नद्यांचा संगमच होतो जणू!
अश्रूं इतके भावना व्यक्त करण्याचे उत्तम साधन जगात क्वचितच सापडेल. सुखात असो वा दु:खात,अश्रू धावतात, वाहतात, बोलतात, सांत्वन करतात. हजार शब्दांचे काम दोन
अश्रू करतात. सहवेदना दाखवतात,आपलसं करून घेतात.
अश्रू न बोलताच खूप काही बोलतात, थेट हृदयात शिरतात.
विरहात तर अश्रू फार सांडतात. आई बहिण भाऊ वडील ही
नाती इतकी जवळची असतात की, थोडं ही काही खुट्ट
झालं की धस्स होतं नि ठोकाच चुकतो हृदयाचा! आणि मग
पाठोपाठ अश्रू आहेतच न बोलता सारे काही सांगायला!
आई आणि मुलांच नातं काय वर्णावं? या नात्याला क्षितिज
नाही इतकं ते मोठं आहे.आई मुलांसाठी किती ही टोकाचा
त्याग करू शकते.आणि मुले आई साठी किती अश्रू ढाळतात
याला सीमा नाही.अश्रूं इतकं पवित्र नातं बहुधा कोणतंच नसावं
असं मला वाटतं.
झोपडीचं नि अश्रूंच नातं अधिक जवळचं असावं असं मला वाटतं.दु:ख दैन्य दारिद्र्य व अश्रू यांचा अतूट संबंध आहे.
नैसर्गिक आपत्तीतही अश्रू बरेच काही सांगून जातात. सहानुभूतीची मग लाटच तयार होते, नुकताच कोविड मध्ये
आपण त्याचा अनुभव घेतला. घरोघरी कोण किती रडले
याला मोजमाप नाही. अजूनही अश्रू थिजले नाहीत अशी
परिस्थिती आहे.घरे उजाडली बरोबर मने ही. अजूनही परिस्थितीशी लोक झुंज देत आहेत हे आपण आपल्या कोशातून बाहेर पडलो तरच कळते.
अश्रू हजर नाहीत असे एकही ठिकाण नाही. घरोघर भांड्याला
भांडे व तोंडाला तोंड लागते याला एकही घर अपवाद नाही.
नवरा बायको नणंद भावजई सासू सून ही भांडणे तर होतातच,
इतर नात्यातही वाजल्याशिवाय रहात नाही. विनोबाजी भावे
म्हणतात, माणूस दु:खाच्या शोधात असतो, सुख त्याला पचत
नाही, खरेच आहे ते… आणि मग या सर्वांबरोबर अश्रू नाहीत
असे होऊच शकत नाही. जिथे जिथे माणूस आहे तिथे तो अश्रू
सोबत घेऊनच फिरतो इतके त्याचे अश्रूंशी जवळचे नाते आहे.
कधी कधी अती आनंदाने ही माणसे रडतात पण फार क्वचित
असे म्हणावे लागेल असा आपला अनुभव सांगतो.
तसे म्हणाल तर .. अश्रूंचे मोठे उपकार आहेत आपल्यावर!
नाहीतर गुदमरून मेलोच असतो आपण नाही का? होय, अति
दु:ख झालं की माणूस ढसाढसा रडतो व एका अर्थाने मोकळा
होतो. खरेच आहे ते! अश्रूंशिवाय सहानुभूती अगदीच कोरडी
हो! साधे समाचाराला गेलो तरी त्यांच्या बरोबर आपले ही डोळे
लगेच भरून येतातच ना! वेदनेला वेदना कळते ती सहवेदना.!
आणि आपण ती अनुभवतोच, नेहमीच असे प्रसंग येतात.
अहो, मुके प्राणी सुद्धा अश्रू ढाळून सहवेदना व्यक्त करतात
इतके अश्रू महान आहेत.
तर, असे हे अश्रू माणसाचे सख्खे सोबती आहेत.फार कामाचे
आहेत हो अश्रू ! न बोलता जिंकून घेतात खूप वेळा.. हो ना?
तर हे नातं जपावं कसं यांच तारतम्य मात्र माणसाला सांभाळता आलं पाहिजे हे मात्र खरं आहे कारण उठसूठ
रडणाऱ्यालाही कोणी बरं म्हणत नाहीच ! ढोंगी लबाड सुद्धा
म्हणतात बरं ! उगाच मगरीचे अश्रू ढाळू नकोस? मी नाही फसणार तुला बरं ..!
मला वाटते, आवरावे हे अश्रू पुराण ….
बाय बाय मंडळी.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १७ मे २०२३
वेळ : रात्री १२: १०
🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾
*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*
*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*
*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*
*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*
*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*
*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*
*👉आजच संपर्क करा*
*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*
*📲9823857786*
*📲8208657954*
*Advt web link 👇*