सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 17 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी पहाटे 5.06 वाजता कणकवली रेल्वेस्थानक येथे आगमन व केसरी, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 6.15 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाच्या विशेष बैठकीस उपस्थिती. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 1 वाजता जलसंधारण अंतर्गत सुरु असलेली कामे, प्रलंबित कामे, भूसंपादन प्रक्रीया या विषयासंदर्भात बैठक. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 1.30 वाजता जलजिवन मिशन अंतर्गत कामांचा आढावा. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 2 वाजता तिल्लारी प्रकल्पाचा पाणीपुरवठा व कोस्टलला जोडणारा पाणीपुरवठा याबाबत आढावा बैठक. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 2.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 वाजता सर्व भाजपा मंडळअध्यक्ष यांच्यासमवेत बुथ सक्षमिकरण अभियान आढावा. स्थळ:- वसंतस्मृती ओरोस, भाजपा जिल्हा कार्यालय. दुपारी 4.15 वाजता कुडाळ येथून चौके, ता. मालवणाकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता श्री.सचिन आंबेरकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. स्थळ:- चौके ता.मालवण जि. सिंधुदुर्ग .सायं. 7 वाजता चौके, मालवण जि. सिंधुदुर्ग येथून मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण.