You are currently viewing विशेष मोहिमेंतर्गत 99 केसेसमध्ये 104 आरोपीविरुद्ध कारवाई – पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल

विशेष मोहिमेंतर्गत 99 केसेसमध्ये 104 आरोपीविरुद्ध कारवाई – पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी

अवैध दारु विक्री व वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष मोहिमेंतर्गत 99 केसेस मध्ये 104 आरोपीविरुद्ध कारवाई केलेली आहे. यामध्ये 1 कोटी 15 लाख 47* हजार 436 किंमतीचा मुद्देमाल त्यात सुमारे 5 हजार 993 मिली दारु व 11 वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वारंवार दारु विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 93 नुसार 20 इसमांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.

जिल्ह्यात दारू विक्री व वाहतूकीबाबत कारवाई करण्यात आलेली असून भविष्यातही जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही व अशा प्रकारची कारवाई निरंतर सुरू राहणार आहे. याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आदेशीत करण्यात आलेले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रक्रीया तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर परिणामकारक कारवाई व्हावी याकरीता जिल्ह्यात अवैध दारु विक्री व वाहतुकीवर निर्बंध आणुन, केसेस करण्यासाठी दिनांक 21एप्रिल ते 12मे 2023 या कालावधीत जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुक करणाऱ्यांविरुध्द विशेष मोहीम राबविण्याबाबत सर्व प्रभारी अधिकारी, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस आदेश दिलेले होते. त्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.असल्याचेही पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा