You are currently viewing हमखास सिंचनासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्या

हमखास सिंचनासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्या

हमखास सिंचनासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्या

– जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत

जिल्ह्याची शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. या शेततळ्यातील पाण्याचा वापर करून फळबागफुलशेतीभाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

        योजनेच्या लाभासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहे, कोकण विभागासाठी जमीन धारणा अट शिथिल केलेली असून अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतः च्या नावावर किमान ०.२० हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. हीच जमीनधारणा अट उर्वरीत महाराष्ट्रासाठी ०.६० हे. आहे. शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळे या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे,जमीनीचा सात-बारा आणि ८-अ उताराआधारकार्ड झेरॉक्सबँक पासबुक झेरॉक्सहमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थीची  निवड पुढीलप्रमाणे, शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळ CSC केंद्रावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet outlet / without inlet outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. सर्वसाधारण क्षेत्र व डोंगराळ क्षेत्रासाठी अनुदान मर्यादा वेगवेगळी असल्याने यापैकी आपले क्षेत्र कोणत्या भागात आहे त्यानुसार योग्य क्षेत्राची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने निवड होईल.

योजनेच्या लाभासाठी आकारमान व अनुदान पुढीलप्रमाणे,

आकारमान (मी)

(बाजु उतार १:१)

यंत्राव्दारेइनलेट, आऊटलेट खोदाई व सिल्टट्रॅपसह शेततळे अनुदान रक्कम (रु) यंत्राव्दारेइनलेट आऊटलेट खोदाई व सिल्टट्रॅपविरहीत शेततळे अनुदान रक्कम (रु)
सर्वसाधारण क्षेत्र डोंगराळ क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्र डोंगराळ क्षेत्र
१५×१५×३ २३,८८१ २६०१० १८,६२१ २०,२३५
२०×१५×३ ३२,०३४ ३४,८२१ २६,७७४ २९,०४६
२०×२०×३ ४३,६७८ ४७,३९८ ३८,४१७ ४१,६२३
२५×२०×३ ५५,३२१ ५९,९७४ ५०,०६१ ५४,१९९
२५×२५×३ ७०,४५५ ७५,००० ६५,१९४ ७०,५४०
३०×२५×३ ७५,००० ७५,००० ७५,००० ७५,०००
३०×३०×३ ७५,००० ७५,००० ७५,००० ७५,०००
३४×३४×३ ७५,००० ७५,००० ७५,००० ७५,०००

 

विशेष सूचना, शेततळ्याचे खोदकाम झाल्यानंतर प्लास्टीकअस्तरीकरण करण्यासाठी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा. प्लास्टीक अस्तरीकरण किंमतीच्या ५० टक्के अथवा ७५ हजार रुपये याप्रमाणे अनुदान उपलब्ध आहे. आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

लाभार्थ्यांची जबाबदारी, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील. कार्यारंभ आदेश किंवा पूर्वसंमती पत्र मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील. शेततळ्यासाठी online पद्धतीने अर्ज करताना अधिक माहितीकरीता संबंधित कृषी सहाय्यककृषी पर्यवेक्षकमंडळ कृषी अधिकारीतालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा