सावंतवाडी
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, नँब तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक सिंधुदुर्ग युनिट, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि मुक्ता ऑप्टिशन्स सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा कार्यक्रम बुधवारी 17 मेला सकाळी साडेनऊ वाजता सावंतवाडी भटवाडी येथील नँबच्या नेत्र रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे नेत्र तपासणी व उपचार होणार असून यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्र तपासणी करून घ्यावी असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे. नेत्र तपासणीसाठी 17 मेला सकाळी नऊ वाजल्यापासून नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक नॅब संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगांवकर तर प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा डॉ विनया बाड, श्री दत्तगुरु बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे उदय भोसले, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा चलवाडी यांच्या उपस्थितीमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर मराठी परिषदेचे पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव देवयानी वरसकर, खजिनदार संतोष सावंत, अमोल टेंबकर आणि नँब सिंधुदुर्गचे पदाधिकारी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे पदाधिकारी मुक्ता फाउंडेशनचे पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.