You are currently viewing विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रोजगार हक्क मेळावा संपन्न

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रोजगार हक्क मेळावा संपन्न

*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रोजगार हक्क मेळावा संपन्न*

*महिला कुस्तीपटूशोषक ब्रिजभूषण सिंह यांस अटक करण्यासाठी घेतली सह्यांची मोहिम*

मुंबई (गुरूदत्त वाकदेकर) :

प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवनमधे काल दि. १३ मे रोजी मुलभूत अधिकार संघर्ष समिती, परिवर्तन झोपडपट्टी विकास परिषद, होश मे आवो अभियान, शिक्षक लोकशाही आघाडी (TDS), प्रबोधन युवासंघ, बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त रोजगार हक्क मेळावा घेण्यात आला.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होऊन देखील लाखो तरुण बेरोजगार आहेत. त्यांत इंजिनिअर, शिक्षक, डॉक्टर, नर्सेस यांची कित्येक पदे रिक्त आहेत. बीए, बीएससी, एम एएम, झालेले बेरोजगार तरूण वणवण फिरत आहेत. यामुळे त्यांना नैराश्य येत आहे. त्यातून काहीजण आत्महत्या करताना आजूबाजूला दिसत आहेत. तेंव्हा त्यांना सरकारने काम देणे गरजेचे आहे. रोजगार हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यांना काम द्या, नाहीतर तोपर्यंत बेकार भत्ता देण्यात यावा. अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली. रोजगाराचा भूलभूत अधिकारांमधे समाविष्ट करण्यात यावा आणि बेकारांना महिना ६ हजार रूपये बेकारभत्ता देण्यात यावा, असा ठराव मांडण्यात आला.

भांडवलशाही पद्धतीचे राज्य असेल तर तेथे शारीरिक आणि मानसिक शोषण अटळ आहे. त्यासाठी समाजवादाचा मार्गच यशदायी असतो. समाजवाद आणायचा असेल तर मोर्चे, आंदोलने व लढा देणे अपरिहार्य आवाहन ते आपण करू या, असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले.

याप्रसंगी रा.स्व.संघ, भा.ज.प. खासदार ब्रिजभूषण सिंह याने महिला कुस्तीपटूंच्या केलेल्या लैंगिक शोषणाबद्दल त्यास तात्काळ अटक करण्यात यावी. यासाठी भारतीय महिला फेडरेशन मुंबई कमिटीच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाला. या गुन्हेगारास ५ दिवसंत अटक करण्यात आली नाही तर महिला फेडरेशन निदर्शने, आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा