You are currently viewing कर्नाटक विजयाचा वेंगुर्ला काँग्रेसने फटाके वाजवून आणि पेढे भरवून केला जल्लोष

कर्नाटक विजयाचा वेंगुर्ला काँग्रेसने फटाके वाजवून आणि पेढे भरवून केला जल्लोष

वेंगुर्ला

कर्नाटक मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेस प्रचंड बहूमताने विजयी झाल्या बद्दल वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या वतीने वेंगुर्ला दाभोली नाका येथे फटाक्यांची आतषबाजी करीत व पेढे वाटत आनंद साजरा केला. यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले कर्नाटकातील काँग्रेसचा प्रचंड विजय हा पुढील येणाऱ्या काळातील काँग्रेसच्या विजयाची नांदी आहे. कर्नाटकात साडेतीन वर्षापूर्वी भाजपने कर्नाटकात असलेले काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार पैश्याचा आणि बळाचा वापर करून पाडले आणि भाजपचे सरकार कर्नाटकात आणले याची चीड कर्नाटकातील जनतेमध्ये होती. भाजप सत्तेत आल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षामध्ये जनहिताची कोणतीही कामे न करता फक्त चाळीस टक्के कमिशन घेणारे सरकार म्हणून हे सरकार परिचित होते. निवडणूकी दरम्यान आपण कर्नाटकातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेले कोणतेही काम सांगण्यासाठी भाजपकडे नव्हते त्यामुळे धार्मिक मुद्दे पुढे करून मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न भाजप कडून केला जात होता. परंतू कर्नाटकातील जनता हे भाजपचे हातखंडे ओळखून होती म्हणून कर्नाटकातील जनता याला बळी पडली नाही. भाजपच्या शिर्ष नेतृत्वाने प्रचारात बजरंगबलीच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न करून बजरंगबलीच्या भक्तांच्या श्रद्धेचा अपमान केला म्हणूनच बजरंगबलीचा हनुमानाचा दिवस शनिवार यादिवशी बजरंगबलीने आपली गदा आपल्या भक्तांच्या श्रद्धेचा अपमान करणाऱ्यांच्या डोक्यात घातली आणि कर्नाटक विधानसभेत भाजपला भुईसपाट केले. आता महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकांमधून भाजपची अशीच हार होईल आणि महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात पुन्हा येईल असा विश्वास इर्शाद शेख यांनी व्यक्त केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, कृष्णा आचरेकर, मयूर आरोलकर, कौशिक परब,संकेत वेंगुर्लेकर, साईराज परब,समीर वेंगुर्लेकर, विशाल वेंगुर्लेकर, मयूरेश घाडी,असद मकानदार, साईश परब, स्वदिप परब,प्रल्हाद परब इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा