You are currently viewing छत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले राज्यस्तरीय काव्य समेंलन

छत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले राज्यस्तरीय काव्य समेंलन

(छ. संभाजीनगर) :

काळीज माझं साहित्य या सामाजिक संस्थेमार्फत पहिले भव्य दिव्य मराठी राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ४ जुन २०२३  रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे (प्राध्यापक, ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक, संपादक, पुणे) तसेच उद्घाटक सौ. संगिताताई भाऊसाहेब जामगे (ज्येष्ठ साहित्यिका, समाज सेविका, आखिल भारतीय मराठी साहित्य परिषद प्रदेश उपाध्यक्ष) असणार आहेत.

या काव्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे सौ. लताताई पगारे (जि.परिषद अध्यक्षा छत्रपती संभाजीनगर), श्री. गुलाबराजा फुलमाळी (कवि, गीतकार, संपादक साहित्य दर्पण), कवि, गझलकार श्री रज्जाक शेख, डॉ. सुशिल सातपुते (कवि, साहित्यिक, प्राध्यापक) असणार आहेत. उद्योजक प्रकाश भोसले, छ. संभाजी नगर्, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण हेंबाडे हे उपस्थित राहणार आहेत.

नवोदित कवि कवयीत्री यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी या काव्य संमेलनाचे आयोजन केले आहे. पुरस्कार समारोह तसेच कवि समेंलन जिजाऊ भवन, बाबा पेट्रोल पंप जवळ, छत्रपती संभाजीनगर येथे ०४ जुन रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल.

उदघाटन,मान्यवरांचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा, कवी संमेलन यामध्ये सहभागी कवींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मानाचा फ़ेटा दिला जाईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रानकवी श्री जगदीप वनशिव (पुणे), कवयित्री वैशाली कंकाळ हे करणार आहेत.

तरी महाराष्ट्रातील कवि -कवयित्रींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपले हक्काच्या व्यासपीठावर स्थान ग्रहण करावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा कवयीत्री सुरेखा बेंद्रे , सरपंच, विजय पाटील, अर्चना राहुरकर डॉ. शुभम बेंद्रे यांनी यांनी केले आहे. कवी कवयीत्री यांनी सहभाग नोंदविण्यासाठी ८६२३८८२८०५ या नंबरवर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − 4 =