You are currently viewing छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त स्पर्धा परीक्षा शिबिर

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त स्पर्धा परीक्षा शिबिर

*छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त स्पर्धा परीक्षा शिबिर*

*डॉ. पंजाबराव देशमुख मिशन आयएएस अकादमीचा उपक्रम*

अमरावती

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात 6 जून पासून प्रारंभ होत असून हा राज्याभिषेक सोहळा पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभर चालणार आहे .या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अमरावतीच्या डॉ पंजाबराव देशमुख अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमाने येत्या 6 जून पासून एक आठवड्याचे राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर आयोजित केले आहे. हे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर अमरावतीच्या श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जवळ असलेल्या ग्रीन सर्कल या परिसरामध्ये संपन्न होणार आहे .या शिबिरासाठी वयोगट वय दहा ते पंचवीस हा ठरविण्यात आला असून या परीक्षा स्पर्धा परीक्षा शिबिरात प्रामुख्याने आय ए एस व इतर स्पर्धा परीक्षा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीचे मालुका आयएएस अकादमीचे प्रशिक्षक श्री प्रशांत भाग्यवंत व श्री अंकित राणे यांना प्रामुख्याने निमंत्रित करण्यात आले आहे .या शिबिरामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे . या शिबिरासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था माफक दरात करण्यात आलेली आहे. या शिबिराच्या स्वागताध्यक्षपदी सुप्रसिद्ध संशोधक प्राचार्य डॉ. व्ही.टी. इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय शिबिरामध्ये काही आयएएस आयपीएस आयआरएस तसेच सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी होणार आहेत .डाँ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही भारतातील नामवंत संस्था असून या संस्थेमार्फत केवळ एक रुपयापासून मध्ये दुसऱ्या वर्गापासून कलेक्टर होण्याचे ट्रेनिंग दिल्या जाते. या मुलांना स्पर्धा परीक्षेची त्या त्या वर्गाची पुस्तके विनामूल्य दिली जातात .याशिवाय त्यांची रितसर परीक्षा घेतली जाते.त्यांचे पेपर तपासले जातात. त्यांना गुणपत्रिका दिली जाते व त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. या अकादमीमध्ये भारतात सर्वात जास्त म्हणजेच 43 हजार विद्यार्थी असून या अकादमीच्या विविध उपक्रमांमध्ये आतापर्यंत 350 आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व इतर अधिकारी सहभागी झालेले आहेत. फक्त एक रुपयामध्ये कलेक्टर होण्याचे ट्रेनिंग दुसरी पासून देणारी भारतातील ही एकमेव अकादमी आहे. छत्रपती शिवरायांना मानवंदना म्हणून त्यांच्या 350 व्या राज्यभिषेक दिनानिमित्त या राष्ट्रीय शिबिराचे आयोजन केले आहे. स्पर्धा परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या किंवा बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या परिपत्रकातून करण्यात आले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी मिशन आयएएस अंतर्गत गेल्या 23 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत यासाठी नियमितपणे सातत्याने कार्यरत आहे. या अकादमीतर्फे ठिक ठिकाणी विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यात येतात. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी च्या वतीने शिवायन हा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चरित्र ग्रंथ देखील यावेळी प्रकाशित होणार आहे अशी माहिती मिशन आयोग तर्फे देण्यात आली आहे. प्रकाशनार्थ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती 9890967003

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा