दोडामार्ग
शालेय विद्यार्थ्यांना यावर्षीपासून मोफत गणवेश व शुज वाटप करण्यात येणार आहे तसेच पुस्तकासोबतच नोट बुक देण्यात येणार असल्याने वहीची गरज भासणार नाही. देशाच्या भावी पिढीला शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करण्यासाठी शासनाने पाऊले उचलली आहेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. श्री देवी खंडेराय भवानी मातेचा प्रतिष्ठापनेचा बारावा वर्धापन दिनानिमित्त कोनाळ ग्रामविकास मंडळ, मुंबई आणि भवानी न्यास मंडळाने केसरकर यांचा अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तहसीलदार अरुण खानोलकर, युवा नेते शैलेश दळवी, गोपाळ गवस, कोनाळ माजी सरपंच ज्ञानेश्वर शेटवे, खानयाळे माजी सरपंच विनायक शेटये, माजी उपसरपंच पांडुरंग लोंढे, अभिमन्यू लोंढे, राणबाराव लोंढे, जयसिंग लोंढे, नारायण सावंत, श्रीराम लोंढे, अशोक लोंढे, शिवाजी लोंढे, रामराव लोंढे, विलास लोंढे, कृष्णा लोंढे, सुभाष लोंढे, पांडुरंग लोंढे, महेश लोंढे, माजी सैनिक जयवंत लोंढे, जेष्ठ नागरिक विश्राम लोंढे व लोंढे परिवार उपस्थित होता.
यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, सुमारे २ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तिलारी खोऱ्यात प्रस्तावित आहे. त्यामुळे रोजगाराचे दालन उपलब्ध होणार आहे. तसेच तिलारी प्रकल्पातील स्थानिकांना संधी दिली जाईल. याशिवाय दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. शिवाजी लोंढे यांनी सुत्रसंचलन केले.