You are currently viewing वेंगुल्र्यात रंगणार 13 रोजी युनिक कपल स्पर्धा

वेंगुल्र्यात रंगणार 13 रोजी युनिक कपल स्पर्धा

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुका गौड सारस्वत समाजातर्फे 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात सर्व जातीतील लोकांसाठी विवाहित दांपत्यांसाठी युनिक कपल 2023 या खुल्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत विवाहितच दांपत्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यात वयाचे बंधन नाही. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यात रोख 15 हजार व मुकुट, द्वितीय क्रमांकास रोख 11 हजार व सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकास 8 हजार व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके तसेच कॅटवॉक, बेस्ट कोऑर्डीनेशन व बेस्ट आऊटफिट यांना रोख रक्कमेची बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी सुजाता पडवळ (9421268239) यांच्याकडे करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा