You are currently viewing परुळेचे माजी सरपंच प्रदिप प्रभू यांना “सामाजिक कार्य पुरस्कार” जाहीर…

परुळेचे माजी सरपंच प्रदिप प्रभू यांना “सामाजिक कार्य पुरस्कार” जाहीर…

वेंगुर्ला

परुळे बाजार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रदिप प्रभू यांना कामगार नेते डॉ. दत्ता सामंत सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्री. प्रभू हे सहकार आणि सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असून त्यांना यापूर्वी शासन शेती पुरस्कार प्राप्त झाला आहे. २००५ ते २०१२ पर्यंत परुळे बाजार ग्रामपंचायतीचे सदस्य तर २०१२ ते २०१७ या काळात सरपंच म्हणून कार्यरत असताना ग्रामपंचायतीला राष्ट्रीय आणि राज्य पुरस्काराच्या रुपाने करोडो रुपयांची बक्षिसे मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोणाच्याही कुठच्याही अडचणीच्या वेळेस धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले प्रदिप प्रभू यांचे या पुरस्कारमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा