तालुका कृषी अधिकारी प्रमोद दिनकर बनकर
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्रातील काजूच्या सर्वकष विकासासाठी काजू फळपिक विकास योजना लागू करण्यात आली आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काजूच्या सर्वकष विकासासाठी काजू फळपिक विकास योजना सन 2022-23 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंअंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन दोडामार्गचे तालुका कृषी अधिकारी प्रमोद दिनकर बनकर यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंमार्फत, खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी अनुदान किमान 50 गुंठे ते जास्तीत जास्त 1. हे. क्षेत्र अनुदान रु.7 लाख 50 हजार. प्लास्टिक आच्छादनासह शेततळे सुविधासाठी अनुदान प्लास्टिक आच्छादन रु. 75 हजार देण्यात येते.
कृषि विभाग जिल्हापरिषदेमार्फत सिंचनाकरिता विहीर रु. 2 लाख 50 हजार प्रति विहीर. कृषियांत्रिकीकरण योजनेमार्फत फवारणी यंत्रे, पावरविडर,ग्रासकटर 18 हजार रु. प्रति युनिट. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंमार्फत जुन्याबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रु. प्रति हेक्टर 0.20 ते 2 हे पर्यंत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान pmfme, मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेंमार्फत काजू प्रक्रिया उद्योग आधुनिकीरणासाठी सर्वसाधारण क्षेत्र 40 टक्के कमाल रु. 10 लाख व डोंगराळ अधिसुचित क्षेत्र 35 टक्के कमाल रु. 13 लाख 75 हजार रु. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना योजनेंमार्फत पेकहाउस व ड्राईंग यार्ड उभारणीसाठी अनुदान सर्वसाधारण क्षेत्र 35 टक्के कमाल रु. 10 लाख व डोंगराळ अधिसूचित क्षेत्र 50 टक्के कमाल रु. 25 लाख रु. देण्यात येते.
शेतकऱ्यांनी महाटीबीटी पोर्टलवर ऑलाईन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज हा महा ई- सेवा केंद्र किंवा कृषि विभागाच्या तालुक्यास्तरीय कार्यालयातून करता येईल. त्यासाठी अर्जासोबत सातबारा, 8अ, बॅकपासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधारकार्ड,इ. कागदपत्रे जोडून अर्ज ऑनलाईन करायचा आहे. दोडामार्ग तालुक्यातील जास्तीत जास्त काजू उत्पादक शेतकऱ्यांनी व प्रक्रिया उद्योजकांनी काजू फळपिक विकास योजनेतील घटकाचा लाभ घेण्यासाठी महाटीबीटी पोर्टलवरुन अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्री.बनकर यांनी केले आहे.