पोलिसांनी लावला अवघ्या आठ तासात छडा
दोडामार्ग:
काही खून प्रकरण ही तपसाअंती त्याचा गुन्हेगार न मिळाल्याने बंद होतात तर काही प्रकरण वर्षानुवर्षे तपास चक्रात अडकलेली असतात, मात्र काल घोटगेवाडी येथे महिलेचा मृतदेह मिळाल्याची बातमी प्रसारित होताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि अवघ्या काही तासात गुन्हेगाराचा शोध घेत त्याना जेरबंद केले. पोलिसांच्या या कामगिरीचे दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल रात्री पावणेदहाच्या सुमारास घोटगेवाडी नवीन पुलाजवळ महिलेचा मृतदेह मिळाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, यावर दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग पोलिस, पोलीस उप विभागीय अधिकारी तसेच श्वान पथक यांनी घटनास्थळी जात पाहणी केली व तपासाची चक्रे वेगाने फिरली यात अनेक दुवे एकत्र जोडत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला व या गुन्ह्यात गोव्यातून महिलेचा पती व त्याच्या साथीदाराला अटक केली. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत असून लवकरच हत्ये मागचे कारण समोर येईल.