You are currently viewing शिवसेनेच्या पावशी सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल

शिवसेनेच्या पावशी सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल

कुडाळ

मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी ग्रामपंचायत जवळ सर्विस रोड व एस. टी. बस प्रवासी शेडसाठी महामार्गावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या पावशी सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह १२ शिवसैनिकांसह ग्रामस्थांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पावशी ग्रामपंचायत जवळ सर्विस रोड व प्रवाशांसाठी एस. टी. बस शेड उभारण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे असे पत्र पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिले होते दरम्यान आज (मंगळवारी) मुंबई गोवा महामार्गावर सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह ग्रामस्थांनी ठिया आंदोलन केले आणि या आंदोलनामध्ये घोषणाबाजी करून सर्विस रोड आणि एसटी बस प्रवासी शेड झाली पाहिजे याच्या घोषणा दिल्या दरम्यान कुडाळ पोलिसांनी बजावलेल्या नोटिसाचा भंग करून महामार्ग रोखून वाहतुकीस अडथळा केल्या प्रकरणी पावशी सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह मिलिंद खोत, सागर भोगटे, महेश पावसकर, निकिता शेलटे, सर्वेश भोगटे, प्रथमेश खोत, प्रशांत तुळसकर, प्रसाद शेलटे, गणेश पावसकर, वसंत भोगटे यांच्याविरुद्ध कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा