सद्गुरु संगीत विद्यालयाचा “मंगेश” भारतात प्रथम…….
सावंतवाडी
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई अंतर्गत हार्मोनियम विशारद परीक्षेत सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडीचा विद्यार्थी कु.मंगेश रामचंद्र मेस्त्री याने सर्वाधिक गुण मिळवत भारतातून प्रथम क्रमांक पटकावला
आज मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या दीक्षांत व पुरस्कार समारोहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ अहमदाबाद येथील कुलगुरू डॉक्टर अमी उपाध्याय यांच्या हस्ते कु. मंगेश यास पदवी व सौ. नलिनी प्रताप कानविंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, सदर पुरस्कार मिळवणारा मंगेश हा जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी ठरला आहे त्याकारणाने सद्गुरू संगीत विद्यालयासाठी व जिल्हावासीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे, अगदी लहान वयात मंगेश ने मिळवलेल्या यशामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे.
मंगेश याचे हार्मोनियम चे शिक्षण सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी चे संचालक व गांधर्व महाविद्यालय सावंतवाडी केंद्राचे केंद्र – व्यवस्थापक गुरूवर्य श्री निलेश मेस्त्री सर यांच्याकडे सुरू आहे. मंगेशच्या या विशेष कामगिरी मुळे त्याच्यासोबतच त्याचे आई-वडील व त्याचे गुरूवर्य निलेश मेस्त्री सर यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेछाचा वर्षाव होत आहे.