You are currently viewing ९ ते १२ मे रोजी विलवडेत श्री देवी माऊली पंचायतन मंदिरात पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

९ ते १२ मे रोजी विलवडेत श्री देवी माऊली पंचायतन मंदिरात पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

सावंतवाडी :

 

विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिरात देवता पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला ९ मे पासून प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची सांगता १२ मे रोजी होणार आहे. सलग चार दिवस भव्यदिव्य असा ‘श्री देवी माऊली पंचायतन आणि परीवार पंचकुंडी पुनःप्रतिष्ठापना यज्ञ महोत्सव’ सोहळयांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी ९ रोजी सकाळी ७ वाजता यजमानाची शरीर शुद्धी, सौरआर्याश्चितं, देवता प्रार्थना,स्वस्तीवाचन, संभारदान, पुण्याहवाचन, ब्राह्मणवरण, स्थळ शुद्धी, जलाधिवास, मंडप प्रतिष्ठा, गणेशयाग, दुपारी महाप्रसाद, बुधवार १० मे रोजी सकाळी १० वाजता शुभमुहुर्तावर मंदिर शिखरप्रतिष्ठा, देवता अधिवास, देवता स्थापना, अग्निस्थापना, ग्रहयाग, वास्तु याग, यथार्थहोम, तत्व होम, दुपारी महाप्रसाद, गुरुवार ११ मे सकाळी ८.४५ वाजता श्री देवी माउली पंचायतनची मुर्ती बलीदान, पुर्णाहुती, महानेवद्य, महाआरती, ब्राम्हणसंभावन, तिर्थप्रसाद, महाप्रसाद, रात्री ठिक ९ वाजता आजगांवकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग, शुक्रवारी १२ मे रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापुजा, सकाळी ११ वाजता कुंकुमार्जन (कुंकमार्जन करणार्या स्त्रियांनी ओटी सोबत आणावी) आरती, नौवद्य, दुपारी महाप्रसाद, सांयकाळी ७ वाजता हणखणे भजन मंडळाचे भजन, रात्री ९ वाजता बाळगोपाळ नाट्यमंडळ विलवडे यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.

तरी सहकुटूंब सहपरीवार मित्रमंडळीसह देवदर्शनाचा लाभ घ्यावा व सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन गोपाळ दळवी (कुळकर) व महादेव दळवी (स्थळकर), समस्त गावमर्यादा, ग्रामस्थ व श्री देवी माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी देवस्थान यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा