*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी अमोल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*
===================
*घटस्फोट कारणे आणि उपाय*
घटस्फोटाचे वाढते प्रमाण आणि त्याला जबाबदार कारणे या विषयावर सर्वांचेच लेख अतिशय अभ्यासपूर्ण आणि वाचनीय झालेले आहेत. आपण सर्वांनी जवळजवळ सर्वच मुद्द्यांना स्पर्श केला आहे तेव्हा आता नवे काय लिहिणार हा मला प्रश्न पडला होता. काही घरगुती कारणांमुळे आधीच लिहायला उशीर झाला. तरीही पेनाला आलेली उबळ स्वस्थ बसू देई ना म्हणून हा प्रपंच.
घटस्फोटाची प्रमुख कारणे कोणती तर घटस्फोटाचे मुख्य कारण म्हणजे लग्न!
अहो लग्नच झाले नाही तर घटस्फोट कुठून होणार?
असो, विनोदाचा भाग सोडून या विषयावरील गांभीर्याकडे वळूया. घटस्फोट हा विषय जसा लग्नाशी निगडित आहे तसेच घटस्फोटात दोन प्रमुख घटक आहेत स्त्री आणि पुरुष. घटस्फोटाची कारणे शोधताना या दोन प्रमुख घटकांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.
स्त्री आणि पुरुषाचा स्वभाव, मानसिक स्वास्थ्य, कौटुंबिक आणि सामाजिक जडण-घडण आणि परिस्थिती अशा अनेक गोष्टी घटस्फोटासाठी कारणीभूत असतात. तसे पाहता घटस्फोट ही वैयक्तिक बाब असल्याने प्रत्येक घटस्फोटामागील परिस्थिती आणि कारणे वेगवेगळी असू शकतात. तरीही ढोबळमानाने विचार करता काही गोष्टी समानही आढळतात. स्त्री आणि पुरुषांच्या स्वभावाचे आणि मुख्यतः त्यांच्या मानसिक स्थितीतील फरकाचे वर्णन जॉन ग्रे यांच्या मेन आर फ्रॉम मार्स अँड वूमन आर फॉर्म व्हीनस या पुस्तकात अतिशय सुंदररीत्या केलेले आहे. पुरुषांच्या मंगळासारख्या रागीट आणि स्त्रियांच्या शुक्रासारख्या कोमल स्वभावातील फरक लेखकाने अचूक टिपला आहे.
पुरुषांचा अंतर्मुख स्वभाव, समस्यांशी एकट्याने लढण्याची वृत्ती, समस्येवर समाधान शोधण्याचा प्रयत्न!
स्त्रियांचा बहिर्मुख स्वभाव, समस्येवर चर्चा करण्याची वृत्ती, एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करण्याची क्षमता!
स्त्री आणि पुरुष दोघांनाही एकाच निसर्गांनी निर्मिले आहे. पण दोघेही एकसारखे नाहीत तर एकमेकांना पूरक आहेत. दोघांच्याही मानसिक गरजा वेगवेगळ्या आहेत. दोघांना पडणारे प्रश्न वेगवेगळे आहेत. उत्तरे शोधण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तरीही दोघे एकमेकांविना अपूर्ण आहेत.
टॉलेमीपासून डॉक्टर बर्न्स पर्यंत आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी स्त्री-पुरुषांच्या संबंधाचा विचार केला आहे तरी हा विचार हजारो वर्षांपूर्वी वेदकालीन ऋषींनी अधिक यथार्थपणे केला होता असे दिसते. मनुस्मृतीत जेथे न स्त्री स्वातंत्र्यमर्हसी म्हटले आहे तेथेच यत्र नार्यस्तू पूज्यंते रमंते तत्र देवता असे स्त्रीच्या देवता स्वरूपाचे वर्णन केले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्री आणि पुरुष दोघांनाही महत्त्वाचे स्थान आहे. आपले आदीं देव महादेव स्वतः अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात प्रकट होतात. कामरूप(आसाम) मध्ये स्त्री राज्य होते तेथे पुरुषांना दुय्यम वागणूक मिळायची. जशी बहुपत्नीत्वाची चाल होती तशी बहुपतीत्वाचीही रीत होती. स्वयंवर प्रथा हे प्राचीन भारतातील स्त्री स्वातंत्र्याचे ढळढळीत उदाहरण होय. असो, या विषयावर लिहिण्याजोगे इतके आहे की त्यासाठी या लेखाचे व्यासपीठ योग्य नाही. तेव्हा आपण आधुनिक काळाकडे परतुया. घटस्फोटाचे प्रमाण आज वाढले आहे हे निर्विवाद.
पण हे फक्त आधुनिक शिक्षणाचे फलित आहे का? तर तसे नाही. खोलात विचार करता इतरही अनेक कारणे आहेत.
विभक्त कुटुंब.
साधारणतः पंचवीस तीस वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय समाजात एकत्र कुटुंब पद्धती होती. एकाच घरात आई-वडील, भाऊ, जावा, चुलत भावंडे गुण्या गोविंदाने नांदायची. नवीन आलेल्या सुनेला सांभाळून घेतले जायचे. छोटे छोटे वाद-विवाद वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने घरातच मिटवले जायचे. मुलीचे आई वडीलही मुलीला सांगायचे, “बेटा मुलगी म्हणजे परक्याचे धन, नवऱ्याकडे उभी केली की आडवीच बाहेर येणार, माहेरी मुलीला स्थान नाही”. त्यामुळे नवीन नवरी ही जमेल तसे नवीन घरात जमवून घ्यायची.
हळूहळू शिक्षण, नोकरी, रोजगार, सतत नुकसानीत जाणारी शेती अशा विविध कारणांनी विभक्त कुटुंबे तयार झालीत. हम दो हमारे दो चा जमाना आला. घरात एकच मुलगा किंवा मुलगी असल्याने आई-वडील मुलांचे लाड करू लागले. जी मुलगी घरात आपले आई-वडील आपले आजी आजोबांशी कसे वागतात हे पाहते ती तिच्या सासरी गेल्यावर सासू-सासर्यांची तशीच वागणार ना?
विभक्त कुटुंब ही काळाची गरज आहे पण आई-वडील मुलांना देत असलेले संस्कार आई-वडिलांच्या मानसिकतेचे प्रतीक आहेत.
“पेराल तेच उगवेल” तर हे झाले लहानपणीचे संस्कार. दुसरे कारण आधुनिक जीवनशैली. आधुनिकतेचा आग्रह धरणे अजिबात चुकीचे नाही पण शरीरासोबत मनही आधुनिक बनायला हवे. इंटरनेट, चित्रपट, मोबाईल ही सगळी साधने माणसाच्या प्रगतीसाठी आहेत. आगीचा वापर अन्न शिजवण्यासाठी होतो आणि आग लावण्यासाठीही.
कसा करायचा ते आपण ठरवायचे.
इंटरनेट आणि रोजगार संधी मुळे आज जग एक खेडे बनले आहे.
पाश्चात्त्य देश प्रगत असल्याने पाश्चात्यांचे अंधानुकरण मोठ्या प्रमाणात होऊ लागले. लिविन रिलेशनशिप आणि इतरही अनेक ज्याचा उच्चारही करवत नाहीत अशा गोष्टी सर्रास होऊ लागल्या. आधुनिक शिक्षणात मूल्य शिक्षणाची कमतरता, स्त्री-पुरुष समानतेच्या अतिरेकी कल्पना, टीव्हीवरच्या भडक सिरीयल्स याही काही प्रमाणात घटस्फोटांची पृष्ठभूमी तयार करू लागल्या.
आणखी एक कारण म्हणजे न्यायव्यवस्था आणि कायदा.
स्त्रियांना संरक्षण देणाऱ्या कायद्यांचा दुरुपयोग होऊ लागला. कायद्याचा वापर करून कायदेशीर ब्लॅकमेल करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आज आपण पाहतोय. कुटुंब न्यायालये घटस्फोटांच्या खटल्यांनी ओसंडून वाहत आहेत. कौन्सिलरच्या धंद्याला बरकत आली आहे.
ही आणि इतर अशी बरीच कारणे आहेत.
पण ही सर्व कारणे बाह्य आहेत.
एक सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे Attitude.
Gratitude is the best Attitude अशी म्हण आहे. आभार मानणे, कृतज्ञता व्यक्त करणे, माफी मागणे आणि क्षमा करणे ही चतुःसूत्री जे दाम्पत्य अंगीकारेल त्यांचा कधीही घटस्फोट होणार नाही.
अमोल देशपांडे
९४०५९७१८५१
*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*
*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*
*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*
*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*
*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*
*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*
*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*
*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*
*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*
👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*
*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*
*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________