मालवण
एप्रिल महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवण येथे २२५ वाहनचालकांवर १ लाख ३५ हजार ८०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर यांनी ही दंडात्मक कारवाई केली