कौस्तूभ गावडे यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन
सावंतवाडी :
विद्यार्थी काँग्रेसच्या कोकण विभाग समन्वयक चेतना रॉय आणि महाराष्ट्र सरचिटणीस शिवराज पार्टे हे सोमवारी ९ नोव्हेंबरला सावंतवाडी येथे येत आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन NSUI आमिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या निमित्त येथे त्याचे विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सकाळी साडे दहा वाजता स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सर्वानी राजरत्न कॉम्प्लेक्स येथील कार्यालयाजवळ उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक देवून ही माहिती दिली आहे. विदयार्थी संघटना वाढीच्या दृष्टीने रॉय या प्रथमच जिल्ह्यात येत आहेत.