*शिराळे गावचा विकास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळेच ; उर्वरित सर्व विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावणार – नासीर काझी*
*शिराळे येथील देव गांगो मंदिर नजीक संरक्षण भिंत व शिंदेवाडी धनगर वस्ती कडे जाणाऱ्या रस्ता कामाचे भूमी पूजन संपन्न*
*आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध*
*वैभववाडी*
ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे मधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये तब्बल 15 लाखाच्या कामांचे भूमिपूजन, देव गांगो मंदिरा नजीक संरक्षण भिंत साठी दहा लाख रुपये तर शिंदे वाडी धनगर वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिला आहे
या कामांसाठी खांबाळे भाजपा पंचायत समिती शक्ति केंद्रप्रमुख प्रकाश पाटील व ग्रामपंचायत सदस्य सडूरे शिराळे प्रभाग क्रमांक तीन तथा भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. गेले कित्येक वर्षे मंदिरा नजीक संरक्षण भिंत करण्याबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून व मुंबई मंडळाकडून मागणी होत होती. यासाठी गावचे बूथ अध्यक्ष विजय पाटील, शिराळे ग्रामस्थ मंडळाचे मुंबई अध्यक्ष जगन्नाथ पाटील, गणपत पाटील, माजी उपसरपंच सखाराम पाटील महेश डेळेकर, संतोष धामणे, गंगाराम शिंदे यांच्यासहित सर्व ग्रामस्थांनी वारंवार विचारपूस करून या कामाबाबत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता व ग्रामस्थांकडून लागेल ते सहकार्य देण्याची भूमिका ठेवत सहकार्य केले अखेर ग्रामस्थांच्या मागणीला यश मिळाले.
तसेच आत्ताच काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नवलराज काळे यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला. यावेळी आपल्या प्रभागातील विकास कामांबाबत दिलेल्या वचनांची जाणीव ठेवत आज रोजी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शिंदेवाडी धनगर वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी रुपये पाच लाख निधी उपलब्ध करून खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. हे काम मंजूर करण्याकरिता शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांनी विशेष सहकार्य केले. तर वाडीतील गंगाराम शिंदे यांच्या सहित संपूर्ण ग्रामस्थांनी वारंवार या कामाबाबत विचारपूस करत लागेल ते सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली.यावेळी प्रभाग सदस्य नवलराज काळे यांनी आपल्या भाषणात राणेसाहेबांच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचा आढावा देत येणाऱ्या काळात अशीच कामे चालू राहिली तर या बुथवर कधीही भारतीय जनता पार्टीचा मतांचा आकडा कमी होणार नाही याची हमी देत गावातील नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागण्याकरिता व एक मोठे काम आमदार नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून या गावांमध्ये भेटलं तर गावातील तीन देवस्थाने जोडली जातील एका धनगर वस्तीचा आणि गावातील इतर सर्व लोकांच्या शेतीकडे जाणारे दळणवळणाची अडचण दूर होईल याबाबत लक्षवेधले या कामांची मागणी प्रभाग सदस्य या नात्याने नवलराज काळे यांनी या ठिकाणी केली. तसेच प्रभागासाठी आमदार नितेश राणे यांनी निधी उपलब्ध करून गावातील विकास कामांमध्ये भर दिल्याबद्दल जनतेच्या वतीने त्यांनी जाहीर आभार मानले. उद्घाटन प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष नासीर काजी यांनी आपल्या मनोगतामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात शिराळे गावानी केंद्रीय मंत्री नारायण राणे कुटुंबियावरती प्रचंड प्रेम केले व ते प्रेम नेहमीच मतपेटीतून दिसून आलं, तालुक्याच्या इतिहासामध्ये मतांचा आकडा जास्त जर कुठल्या बूथ वरचा असेल तर तो शिराळे गावचाच आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आजपर्यंत राणे कुटुंबावरती शिराळे गावाने केलेले प्रेम यापुढे असेच कायम टिकून राहावे नारायण राणे साहेबांनी देखील या गावाला काही कमी पडू दिलं नाही व यापुढे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून उर्वरित सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला. यापुढे पाटीलवाडी येथील नाल्याचे कामासाठी रुपये चार लाख मंजूर करून दिले आहेत त्याचेही काम येणाऱ्या काळात सुरू होईल. पंचायत समिती खांबाळे शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील आपल्या भागातील विविध विकास कामे आमच्याकडे मांडत असतात त्यांचा बारकाईने लक्ष आपल्या विभागाकडे मतदारसंघाकडे आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे व आपल्या गावचे या प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी देखील ग्रामपंचायत स्तरावरून प्रभागात आपल्या वाढीतील जनतेसाठी पंधरा वित्त आयोग असो ग्रामपंचायत इतर फंड असो आपल्या प्रभागापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे करत आहेत त्यामुळे तुमच्यापर्यंत थेट ग्रामपंचायत पासून ते आमदार खासदारांच्या निधी पर्यंतचे सर्व लाभ या गावाला निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी कडून मिळतील असा विश्वास भाजप तालुकाध्यक्ष नाशिक यांनी व्यक्त करत प्रकाश पाटील आणि नवलराज काळे यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जगन्नाथ पाटील यांनी मानले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काजी साहेब, शक्ती केंद्रप्रमुख भाजपा खांबाळे पंचायत समिती प्रकाश पाटील, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रभाग क्रमांक 3 नवलराज काळे, ग्रामपंचायत सरपंच दीपक चव्हाण, शिराळे बूथ अध्यक्ष विजय पाटील, शिराळे अध्यक्ष महिला आघाडी अमृता पाटील, युवा अध्यक्ष शिराळे बूथ महेश डेळेकर, ग्रामस्थ मंडळाचे मुंबई अध्यक्ष जगन्नाथ पाटील,धनगर समाज नेते गंगाराम शिंदे,रमाकांत रावराणे, माजी उपसरपंच सखाराम पाटील, माजी उपसरपंच संतोष पाटील, रामचंद्र बोडेकर, संजय पाटील, अनिल पाटील, जानेश शिंदे, रामचंद्र शिंदे, गंगाराम बोडेकर, उत्तम पाटील, हरिश्चंद्र पाटील, चंद्रकांत डेळेकर, नामदेव पाटील, व प्रभाग क्रमांक तीन शिराळे गावातील समस्त ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.