कणकवली
कणकवली तालुक्यातील वरवडे संगम पॉईंट येथील गडनदी पात्रातील मोठया खडकावर बसून सेल्फी काढत असताना हरीकृष्णन टी मनोज (वय – १७, रा.कणकवली, मुळ रा.केरळ) पाय घसरुन काल सायंकाळी ६.१५ वाजता बुडाला. त्यांचा मृतदेह आज सकाळी ७ वाजता नदीपात्रात बुडालेला आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त की,काल कणकवली येथील तीन युवक वरवडे नदी पात्रात संगम पॉईंट एका दगडावर मोबाईल मधून सेल्फी घेत होते. अचानक हरीकृष्णन यांचा पाय घसरला आणि काही क्षणातच तो नदीत बुडाला. काही वेळाने त्याच्या सोबत असलेल्या मित्राने घरी कळवले तेव्हा त्या बुडालेला हरीकृष्णन यांचा काका आणि नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्र झाल्याने शोध लागला नव्हता.
आज कणकवली पोलिसांनी पुन्हा सकाळी भोरपी समाजाच्या लोकांना घेऊन नदीत शोध मोहीम राबवली. वरवडे नदीपत्रात पाण्यात हरीकृष्णन यांचा मृतदेह सकाळी ७ वाजता आढळून आला.पोलिस निरीक्षक अनिल जाधव पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. तेथील नागरिकांच्या मदतीने त्या युवकाला शोधण्याची मोहीम यशस्वी झाली. हरीकृष्णन याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.