You are currently viewing जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

ॲड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद

आरोपी अशोक बाळावंत देसाई. शिवराम सगुण दळवी यांनी फिर्यादी आणि आरोपी हे एकाच विद्यालयात नोकरीस असून फिर्यादी यांना रोज शारीरिक व मानसिक छळ करीत असे म्हणून ते उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांचे कार्याल्यासमोर दि.16/1/2018 रोजी उपोषणास बसणार होते.. फिर्यादी याने सदरचे उपोषण करून नका आपण वाटाघाटी करूया असे आरोपीने निरोप दिला होता.  परंतु फिर्यादी याने सदरचे उपोषण घेणेस नकार दिला. याचा राग येउन आरोपी क्रं 1 याने जातीवाचक शिवीगाळ केली तसेच आरोपी क्रमांक 2 यांनी धमकी दिली. अश्या आशयाचा ठपका ठेवला होता.  सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सबळ पुरावा गुन्हा शाबीत होण्याजोगा न आल्याने तसेच गुन्हा आरोपी याने केलेला आहे हे सरकार पक्ष शाबीत करु न शकल्याने आरोपी च्या वकिलांचं यशस्वी युक्तिवाद ग्राहय मानून प्रमुख जिल्हा सत्र नायाधीश एस. जे . भारूका ह्यांनी दोन्ही आरोपी ची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्यावातीने वकील श्री अशपाक शेख ह्यांनी काम पहिले..

प्रतिक्रिया व्यक्त करा