*सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनने मुंबईला पाचवा विजय मिळवून दिला*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३ च्या ४५ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. नाणेफेक जिंकल्यानंतर धोनीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतत होते. १९.२ षटकांत त्यांनी १२५/७ मजल मारली होती. आयुष बदोनीने ३३ चेंडूत चार षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद ५९ धावा काढल्या. त्याच्या व्यतिरिक्त निकोलस पुरन (२०), कायल मेयर्स (१४) आणि मनन वोरा (१०) यांनीच दुहेरी आकड्याला स्पर्श केला. तर चेन्नईसाठी मोईन अली, महेश ठिकशाना आणि माथेशा पाथीराणा यांनी दोन तर रवींद्र जडेजाने १ गडी बाद केले.
आयपीएलच्या इतिहासात क्रुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या हे दोन्ही भाऊ दोन वेगवेगळया संघांचं प्रतिनिधीत्व करत आहेत. पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला.
आयपीएल २०२३ च्या ४६ व्या आणि आजच्या दुसर्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवून चालू आयपीएल मोसमातील पाचव्या विजयाची नोंद केली. या विजयानंतर रोहित शर्माचा संघ गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ९ सामन्यांत पाच विजय आणि चार पराभवानंतर त्याचे १० गुण आहेत. दुसरीकडे, पंजाबचा १० सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. त्याचे १० गुण असून ते सातव्या स्थानावर आहेत.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने २० षटकांत ३ बाद २१४ धावा केल्या. मुंबईने १८.५ षटकात ४ गडी गमावत २१६ धावा करत सामना जिंकला. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी धडाकेबाज खेळी केल्यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी स्टाईलमध्ये सामना संपवला.
ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. ईशानने ४१ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने सात चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. त्याने आठ चौकार आणि दोन षटकार मारले.
तिलक वर्माने अखेरच्या क्षणी झटपट धावा काढत सामना संपवला. तिलकने १० चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. टीम डेव्हिडने १० चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १९ धावा केल्या. तिलकने १९ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून सामना संपवला.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना खास होता. मुंबईसाठी रोहितचा हा २०० वा सामना होता, पण तो बॅटने खास बनवू शकला नाही. तीन चेंडूंचा सामना केल्यानंतर रोहित ऋषी धवनचा बळी ठरला. मात्र, संघाने सामना जिंकून रोहितला या खास प्रसंगी एक अप्रतिम भेट दिली.
पंजाबच्या फलंदाजांनी २१४ धावा केल्या तेव्हा संघ सामना जिंकेल असे वाटत होते, परंतु गोलंदाजांनी त्यांच्या मेहनतीवर पाणी ओतले. नॅथन एलिस आणि ऋषी धवन वगळता इतर चार गोलंदाजांनी १० पेक्षा जास्त धावगतीने धावा दिल्या. अर्शदीप सिंगने ३.५ षटकात ६६ धावा देत एक विकेट घेतली. ही त्याची आयपीएलमधील सर्वात खराब गोलंदाजी आहे. सॅम करणने तीन षटकांत ४१ धावा, हरप्रीत ब्रारने दोन षटकांत २१ धावा आणि राहुल चहरने तीन षटकांत ३० धावा दिल्या. अर्शदीप आणि ऋषी यांना प्रत्येकी एक यश मिळाले. नॅथन एलिसने चार षटकांत ३४ धावांत दोन बळी घेतले.
पंजाब किंग्जबद्दल बोलायचे तर स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन आणि यष्टिरक्षक जितेश शर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूत नाबाद ८२ आणि जितेशने २७ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने आपल्या खेळीत सात चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी जितेशने पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. कर्णधार शिखर धवनने २० चेंडूत ३० आणि मॅथ्यू शॉर्टने २६ चेंडूत २७ धावा केल्या. प्रभसिमरन सिंगला केवळ नऊ धावा करता आल्या. मुंबईकडून पियुष चावलाने दोन बळी घेतले. अर्शद खानला एक विकेट मिळाला.
ईशान किशनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-