You are currently viewing कणकवलीत वैश्य समाज मुख्य सल्लागार पदी दादा कुडतरकर यांची निवड

कणकवलीत वैश्य समाज मुख्य सल्लागार पदी दादा कुडतरकर यांची निवड

वैश्य समाज कणकवली तर्फे अध्यक्ष दादा कुडतरकर यांचा भव्य सत्कार

कणकवली :

वैश्य समाज कणकवली या संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा येथील विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे श्री दादा कुडतरकर यांचे अध्यक्षते खाली सायंकाळी 4 ते 6 या दरम्यान संपन्न झाली. सभेत अजेंड्यापर सर्व विषय हाताळणेत आले.

नूतन अध्यक्ष पदी श्री महेंद्रकुमार मुरकर, सेक्रेटरी श्री गुरुनाथ पावसकर, उपाध्यक्ष श्री लहू पिळणकर, कोषाध्यक्ष श्री विलास कोरगावकर, सदस्यपदी सर्वश्री राजन पारकर, प्रसाद अंधारी, उमेश वाळके, सुनील पारकर, नंदकुमार काणेकर, सौ नीलम धडाम, सौ शीतल सापळे तर सल्लागार पदी सर्वश्री दादा कुडतरकर, दीपक अंधारी, आनंद अंधारी, राजेश सापळे, नागेश मोरये नांदगाव, श्रीकृष्ण नानचे फोंडाघाट, प्रकाश पारकर बुवा कासारडे यांची सरवानुमते निवड करणेत आली.

यावेळी काशी पदयात्री अन 75 वर्षावरील वैश्य समाजातील बांधवांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणेत आले. यावेळी श्री आनंद अंधारी यांनी वैश्य समाज कणकवली यांना वैश्य भवन कणकवली साठी 1 एकर जागा विना मोबदला देणेची कबूल केलेने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी त्यांचे 3 वर्षे कालावधीत खालीलप्रमाणे कार्य केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

1. वधुवरांची स्वप्ने सफल होणेसाठी, नाविन्यपूर्ण विचारांचे आदानप्रदान अन समाजुन्नत्ती यासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी भव्य वधुवर सोहळा अन स्नेह संमेलन,

2. कोरोना कालावधी असूनही सन 20-21 अन 21-22 मध्ये 10 वी 12वी मधील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार

3. सन 20-21 मध्ये अतिवृष्टी कामी अवर्षण प्रवण भागातील सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फंडास रक्कम रु10000 वैश्य समाज द्वारा तहसीलदार कणकवली यांचेकडे अदा

4. जात पडताळणी कामी प्राथमिक जलद दाखले देणेसाठी प्रांताधिकारी कणकवली याना निवेदन

5. हल्दीपुर गुरुमठ द्वारा आयोजित 2 महिने चातुर्मास सोहोल्याचे आयोजन अन नियोजन यामद्ये सक्रिय योगदान, वैश्य समाज कणकवली द्वारा जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू अन सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार,चातुर्मास सोहळा यशस्वी करून सर्व वैश्य समाजास अध्यात्मिकदृष्टया एकत्र आणनेची किमया

6. श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचे 3500 किमी पदायात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन काशी येथील सांगता समारंभात सर्वांच्या उपस्थितीसह अन सहकार्याने सक्रिय सहभाग

7. समाजातील सरपंच, उपसरपंच अन सदस्य यांचा सत्कार

8. पदयात्री अन 75 वर्षे वरील जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार

9. सर्वांचे सहकार्याने समाज बांधवांच्या एकतेची मशाल पेटवून भेदभाव, मतभेद यांना फाटा देऊन एकाच झेंड्याखाली आणण्याची पराकाष्ठा केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा