You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी – वेंगुर्ले चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी – वेंगुर्ले चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी , वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर व व्हाईस चेअरमन पदी सौ.अंकीता आनंद बांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
१९९४ मध्ये स्थापन झालेल्या भंडारी पतसंस्थेचे बाबली वायंगणकर हे १९ वे चेअरमन आहेत . १२ संचालक असलेल्या ह्या पतसंस्थेत ११ संचालक बिनविरोध निवडून आलेले असून एक जागा रिक्त आहे .
चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची निवड जाहीर झाल्यानंतर भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी पतसंस्थेत जाऊन त्यांचे व व्हा.चेअरमन अंकिता बांदेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक सौ.सारीका काळसेकर , प्रकाश गडेकर , जगंन्नाथ डोंगरे , गुरुनाथ कांबळी , व्यवस्थापक रेडकर उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा