You are currently viewing वेंगुर्ले येथील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन केले उद्घाटन

वेंगुर्ले येथील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन केले उद्घाटन

वेंगुर्ला

शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीमध्ये राहणा-या नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सोयीसुविधा मिळणेकरीता दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनविण्यासाठी, सातत्यपूर्वक व गुणवत्तापूर्वक सेवा पुरविण्यासाठी हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्याची‘ स्थापना शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र वेंगुर्ला नगरपरिषद येथे करण्यात आली असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान १५वा वित्त आयोगांतर्गत शहरी कार्यक्षेत्रामध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये ८ शहरी आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत.
यावेळी प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, गटविकास अधिकारी मोहन भोई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर, तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज कुरणे, डॉ.ऋषिकेश दुघगे, डॉ.अश्विन सिग, तालुका आरोग्य सहाय्यक वैभव आंबेरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र तुळसच्या पाटलेकर, एम.जी.धुरी, विजय तळकर, व्ही.एम.गंगावणे, ए.आर.सोनावडेकर, एम.एम.शेडगे, मिनल बागायतकर, गणेश वेतोरकर, सतिश अणसूरकर, देवदास पार्सेकर, यशवंत गोसावी आदी उपस्थित होते.

‘आपला दवाखाना‘मध्ये दुपारी २ ते रात्रौ पर्यंत बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आदी सुविधा देण्यात येणार आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा