You are currently viewing कणकवली नगरपंचायतचा ८९ लाखांचा अद्यावत अग्निशामक बंब लवकरच सेवेत

कणकवली नगरपंचायतचा ८९ लाखांचा अद्यावत अग्निशामक बंब लवकरच सेवेत

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती

अग्निशामक दलाच्या केंद्र जमिनीच्या भूसंपादनासाठी ४ कोटी ७० लाख …

कणकवली

कणकवली नगरपंचायत ८९.९२ लाखांचा नवीन अद्यावत अग्निशामक बंब लवकरच सेवेत येत आहे. अग्निशामक दलाच्या केंद्रासाठी जमिनीचे भूसंपादनासाठी ४ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.भविष्यात कणकवलीत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी मदत होईल, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.

कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,संजय कामतेकर,मेघा गांगण,विराज भोसले,महेश सावंत,किशोर राणे,अजय गांगण आदी उपस्थित होते.

कणकवली नगरपंचायतने गेल्या दोन महिन्यांपूर्वी जुना अग्निशामक दलाचा बंब निर्लेखित केला होता.त्यानंतर नगरपंचायत सरकारकडे नवीन अग्निशामक बंब खरेदीचा प्रस्ताव केला होता.नवीन अद्यावत ८९ .९२ लाखांचा निधी आम्ही खरेदी करत आहोत.त्याला चेस अशोक लेलँड कंपनीची घेत आहोत.त्याची वर्क ऑर्डर आम्ही दिली आहे.येत्या दीड ते दोन महिन्यात बॉडी बांधून आपल्याला मिळणार आहे.वजन १९ टन आणि ६ हजार लिटर पाणी आणि १ हजार फोम् असणार आहे.इंजिन पॉवर १८० एचपी, शिडीची लांबी १०.५ मीटर आहे.गाडीची केबिन मध्ये चालक अधिक ४ कर्मचारी बसण्याची व्यवस्था आहे.या बंबला पाणी फवारणी २००० लिटर प्रती मिनीट आहे.प्रथोमोपाचार पेटी १० माणसांकरीताआहे,असे समीर नलावडे यांनी सांगितले.

कणकवली अग्निशामक केंद्र २४ तास चालवण्यासाठी जागा भूसंपादन प्रस्ताव केला आहे. भूसंपादन अधिकारी लवकरच संबंधित जमीन मालकांना त्याचे वाटप करणार आहेत.त्यासाठी नगरपंचायतने ४ कोटी ७० लाख दिले आहेत.त्या अग्निशामक दलाच्या गाड्या उभे राहतील.तसेच भोंगा असेल किंवा आपत्ती कालावधीत त्याचा उपयोग होईल, अशी यंत्रणा लावण्यात येणार अग्निशामक दलाच्या गाडीवर कार्यरत असलेले कर्मचारी निवास व्यवस्था असेल. जेणेकरून आपत्ती झाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाची गाडी रवाना होतील. भूसंपादित जागेवर मुख्याधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांना राहणेचा व्यवस्था केली जाणार आहे,असे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा