*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माय मराठी*
माझी मराठी भाषेचं
किती गावु कौतुके
सगळ्या भाषेचा ताज
शब्द पडतील फिके
चार दिशांना निघतो
मराठी भाषेचा सूर
मृदु मंजुळ, मधुर
तिची ख्याती दूरदूर
ओवी अभंग कीर्तन
लोकगीत वा लावणी
माझ्या मराठी भाषेच्या
एकत्रितल्या भगिनी
डोंगर दरीत घुमतो
मराठी भाषेचा नाद
रान पाखरेही देती
माय मराठीला साद
परदेशात सन्मान
माझ्या भाषा मराठीचा
गगनी झळके पताका
उंच जरी पटक्याचा
काय वर्णवी थोरवी
माझ्या मराठी भाषेची
शिरोमणी सरताज
भाषा जगी दिव्यत्वाची
माझ्या मराठी मातीत
नांदतो कष्टकरी
पिके मोत्याची कणसे
खातो कष्टाची भाकरी
*शीला पाटील. चांदवड.*