You are currently viewing स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

गांजा हा अंमली पदार्थ विक्री  करणाऱ्या इसमावर

गुन्हा दाखल 1 लाख 11 हजार रुपयाचा ऐवज हस्तगत

सिंधुदुर्गनगरी

 1 मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास भैरववाडी, कुडाळ येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेवून येणार असल्याची विश्वसनीय बातमी मिळालेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी भैरवाडी कुडाळ येथे सापळा रचून थांबलेले असतांना दुपारचे सात एक इसम मोपेड वाहनाने कुडाळ भैरववाडी येऊन तेथे संशयास्पद हालचाली करताना दिसून आल्याने त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशीअंती अंगझडतीत व मोपेड गाडीच्या डिकीमध्ये 63090  रुपये किंमतीचा 2 किलो 103 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ तसेच 40,000 रुपये किमतीचे दुचाकी 8000 रुपये किमतीचा मोबाईल असा मिळुन एकूण 1,11,000 मिळून रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करून आरोपी विरुध्द कुडाळ पोलीस ठाणे गु.र.नं. 141/2023, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(c), 20 (B) 2 (B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सपोनि महेंद्र घाग, पोउनि रामचंद्र शळके, पोलीस अंमलदार गुरुनाथ कोयंडे, अनिल धुरी, प्रकाश कदम, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, अमित तेली, प्रथमेश गावडे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सहभाग घेतला.

            पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, यांनी  जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन करणाऱ्या इसमांची माहीती घेऊन त्यांचे विरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार अवैध व्यवसायात गुंतलेल्या इसमांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांचेविरुध्द कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे.

             अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यात अंमली पदार्थ, गुटखा आणि दारु असे अवैध धंदे करणाऱ्याविरुध्द  कारवाईसाठी विशेष  मोहिम राबविण्यात येत आहे.

            अंमली पदार्थ, गुटखा आणि दारू व इतर अवैध धंदे करणाऱ्या विरुध्द कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले,सहा. पोलीस निरीक्षक,   महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तैनात करण्यात आलेली आहेत.जिल्ह्यात अंमली पदार्थ, गुटखा आणि दारु व इतर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली असून अशीच कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. तसेच तरुण पिढी अशा अवैध मार्गाकडे वळून व्यसनाधिन होवू नयेत याकरीता पोलीस दलाकडून जनजागृती करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा