*मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी, दहावीच्या १९८८-८९ बॅचचे स्नेहसंमेलन थाटात संपन्न*
सावंतवाडी
मिलाग्रीस हायस्कूलच्या १९८८-८९ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या बॅचचे स्नेहसंमेलन सावंत फार्म माडखोल येथे थाटात संपन्न झाले. सावंतवाडी शहरात, आसपास राहणारे मित्र मैत्रिणी अधून मधून भेटत असतात परंतु दहावी नंतर करियर, पालकांच्या बदल्या, किंवा उच्च शिक्षणासाठी ताटातूट झालेले मित्र मैत्रिणी तब्बल ३४ वर्षांनी जेव्हा भेटतात तेव्हा ना चेहरे ओळखीचे असतात ना स्वभाव ज्ञात असतात तर सोबत असतात त्या बालपणीच्या आठवणी….!
मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीच्या १९८८-८९ बॅचच्या मित्र मैत्रिणींसाठी असाच एक आनंदाचा क्षण घेऊन आला तो दिवस म्हणजे ३० एप्रिल…!
ज्यावेळी मुलगा मुलगी एकमेकांशी बोलणे देखील कल्पनेत नसायचे अशा दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले मित्र मैत्री रविवारी ३० एप्रिल रोजी सावंतवाडी जवळील माडखोल धरण परिसरातील सावंत फार्म वर एकत्र आले. बालपणीचे अंधुकसे आठवणारे चेहरे आता बदलले होते परंतु भेटीची उत्कंठा मात्र मनमनातून ओसंडून वाहत होती. व्हॉट्सॲप समूहावर आवाहन केल्यानंतर अनेकांनी भेटण्याची तयारी केली. बेंगलोर, पुणे, कोल्हापूर सह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मित्र मैत्रिणी एकत्र आले. तेव्हाचे शाळा सोबती आता कुणी अधिकारी, व्यावसायिक, नोकरदार झालेत परंतु एकत्र आले ते केवळ “मित्र मैत्रिणी” या एकाच पदावर…! सकाळी ९.०० वाजल्यापासून सुरू झालेला हा आनंद सोहळा सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत रंगला. सकाळी १०.०० वाजता यथेच्छ नाश्ता करून गप्पागोष्टींचा आनंद घेत फार्म मधील निसर्ग सौंदर्याचा व विविध खेळांचा आस्वाद घेतला. फार्मचे आकर्षण असलेले संगीत कारंजे, धबधब्यामध्ये सर्वांनी चिंब भिजून संगीताच्या तालावर जवळपास तासभर नृत्याचा आनंद घेतला. फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग करून आठवणींना मोबाईलच्या गॅलरी मध्ये कायमचे बंद केले पुन्हा पुन्हा पाहण्यासाठीच…!
कोकणी पद्धतीचे मत्स्याहारी जेवण त्यात तव्यावर तळलेले सुरमई, कोळंबी आणि माखल्या (squid) फ्राय, तिसऱ्या, गोलंबा चटणी, चिकन मसाला, भाकरी आणि पनीर चीली, गोबी मंच्युरियन, अशा एकापेक्षा एक सरस खाद्य पदार्थांवर ताव मारला. दुपारच्या सत्रात गाणी, एकमेकांची ओळख, मनोगत आणि दत्तू मोहिते याच्या गजलींचा कार्यक्रम यामुळे स्नेहसंमेलनात आणखी रंगत आली. नरसोबाची वाडी वरून आलेली मैत्रीण रेणुका कुलकर्णी पुजारी हिने मनोगत व्यक्त करताना “३४ वर्षांनी मित्र मैत्रिणींना भेटले परंतु त्यांनी केलेले स्वागत पाहता मला माहेरी आल्याचा आनंद मिळाला” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. बेंगलोर वरून आलेली अस्मिता धर्माधिकारी हिने देखील एवढ्या वर्षांनी भेटून खूप आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. पुणे येथून आलेली संगिता रासकर हिने देखील आनंद व्यक्त करत समूहाच्या माध्यमातून सामाजिक भावना जपत गरजवंताला मदत होईल असे सामाजिक कार्य भविष्यात करू असे आवाहन केले, त्याला सर्वांच्या वतीने दीपक पटेकर, उदय पारिपत्ये आदींनी समर्थन केले. सावंतवाडी बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंतापदी असलेल्या अनामिका चव्हाण यांनी देखील सर्वांनी एकत्र आल्याने आनंद झाला असे मत व्यक्त केले. आपली ओळख आणि मनोगत मांडताना सर्वांच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद दिसत होता.
मिलाग्रीस १९८८-८९ दहावीच्या या स्नेहसंमेलनासाठी बेंगलोर येथून अस्मिता धर्माधिकारी, कोल्हापूर नरसोबा वाडी येथून रेणुका कुलकर्णी पुजारी, पुणे येथून संगिता रासकर, प्रणोती सावंत, बेळगावहून अल्लाबक्ष नदाफ, मालवण येथून वहिदा शेख, कुडाळ दत्तू मोहिते, सातार्डा येथून उदय पारीपत्ये, रेडीतून श्रीपाद तिवरेकर, सावंतवाडीतील दीपक पटेकर, प्रशांत कासकर, अनामिका चव्हाण, संदीप कांदे, प्रशांत आरोलकर, शेखर जाधव, आबा बोंद्रे, सुजित निखार्गे, प्रसाद सावंत, तुकाराम(तुषार) सावंत, विठ्ठल सावंत, राजेश तारी, नागेश बीद्रे, नेपोलियन डिसोजा, अभिजित भंडारे, चारुदत्त गावडे, विनायक बागायतकर, डॉ.समीर सडेकर, अनिल नाईक तेर्सेबांबर्डेतील राजेंद्र शिर्के आदी सहभागी झाले होते. सौ.मोहिते व कुमारी समृद्धी मोहिते यांनी देखील सहभाग घेतला. स्नेहसंमेलनाच्या नियोजनात दीपक पटेकर, प्रशांत कासकर, अनामिका चव्हाण, उदय पारीपत्ये आदींनी विशेष मेहनत घेतली. दीपक पटेकर यांनी आभार प्रदर्शन करताना स्नेहसंमेलनात सहभागी सर्व मित्र मैत्रिणींचे आभार मानून असेच जेव्हा जेव्हा हाक देऊ तेव्हा एकत्र या असे आवाहन केले.
*संवाद मिडिया*
*🥘मुंबईतील तवा फ्रायची चव🥘*
*🧇आता चाखा सावंतवाडीत !🧇*
*🐔The Rooster*🐔
🍗🍗 *(Hot & crispy) 🍗🍗 घेऊन आलय*
🧇 *FAMOUS* 🧇
🥘 *तवा फ्राय* 🥘
*👨🏻🍳आपल्या सिंधुदुर्गात !👨🏻🍳*
🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗
*🥠चिकन मोगलाई तवा फ्राय*
*🍲मटण दरबारी तवा फ्राय*
*🍤प्रॉन्स तवा फ्राय*
*🥟फिश तवा फ्राय*
*🥩पापलेट तवा फ्राय*
*🍗विंटर लेग*
*🧇मलाई टिक्का*
*🍖गोल्डन टिक्का*
*🥯भेजा फ्राय*
🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔
*🥘🫕तवा फ्रायचे 60 हून अधिक फेमस मेन्यू येणार चाखता🫕🥘*
*🍳ऑमलेट व्हरायटीसह डेलिशस् 🍜चायनीज सूप,🍗 चिकन स्टार्टर, 🍝नुडल्स, 🥗व्हेज चायनिज डिशेस, 🍤चिकन चायनिज डिशेसही उपलब्ध*
🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔🍗🐔
*🍤मोती तलाव काठावर तडका तवा फ्रायचा 🍤*
*🍗 Hot & crispy🍗 मेन्यू *🐔The Rooster 🐔 सावंतवाडीचा !*
*🛣️ पत्ता : The Rooster, मोती तलाव समोर, रामेश्वर प्लाझा, कॉलेज रोड, सावंतवाडी*
*संपर्क :*👇
*📱9168010755*
*जाहिरात लिंक*👇
———————————————-