*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
*कान्हा*
निळा सावळा हा कान्हा
बालरूप अवखळ
खोडकर दिसे जरी
मन त्याचे हो नितळ!!
दही दूध लोणी चोरी
भाव मिश्कील डोळ्यांत
करी खोड्या नाना परी
आवडता सगळ्यांत!!
सुकुमार तू लाघवी
कुंतलात मोरपीस
पितांबर कटिवरी
माळ सुरेख भरीस!!
गोपी सा-या मोहवितो
जरी सांडतो घागरी
विसरती तुझा गुन्हा
जेव्हा घुमते बासरी!!
🍃🍃🍁🍃🍃🍁🍃🍃🍁
*अरूणा दुद्दलवार@✒️*
*संवाद मीडिया*
*🏟️कृष्णामाई बोअरवेल🏟️*
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*
*📍 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*🛑 प्रोप्रा. : आनंद रामदास*
📲 *संपर्क :*
*9422381263 / 7720842463*
*Advt link*
———————————————-