You are currently viewing अन्नपूर्णा सुखी भव!

अन्नपूर्णा सुखी भव!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

*अन्नपूर्णा सुखी भव!*

छोटा आदित्य संध्याकाळी खेळून दमून घरी आला तर आजीनं त्याला हातपाय धुवायला सांगून एका वाटीत लाडू आणि छानसं थंडगार कोकम सरबत काढून ठेवलं.

आजी हा लाडू तू केलास माझ्यासाठी?

हो बाळा तुझ्यासाठी, तुझ्या पप्पासाठी मम्मीसाठी.

आजी तू किती गोड आहेस ग. रोज मी घरी आल्यावर ते चिप्सचे पॅकेट फोडतो आणि खातो, नाहीतर फरसाणा, बिस्किटे… मला बिलकुल आवडत नाहीत गं ते… पण भूक लागते ना.. काय करायचं मग?

खरंच काय करणार लहान मुलं जर का घरात तहान लाडू आणि भूक लाडू बनवणारे कोणी नसेल तर?
बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे. जर बदलत गेले नाही तर तेच तेच जगणे निरस अर्थहीन होत जाईल. पूर्वी बायका घर, चूल, मूल यातंच रमयाच्या. आता पुरुषांच्या बरोबरीने बाहेर पडतात, नोकरी व्यवसाय सांभाळतात आणि घरच्या जबाबदार्याही पार पाडतात. पूर्वीच्या नवरे लोकांना हातात पाण्याचा ग्लास लागायचा. हुकूमशाही पद्धतीनेच घर चालायचं. आता दोघं थकून भागून घरी आल्यावर कामाचीही वाटणी झालेली दिसते (बऱ्याच घरात, सगळ्या नाही !)
अगदीच उशीर झाला तर बाहेरूनच येताना पार्सल घेऊन येणे किंवा परस्पर हॉटेलमध्ये जेवण करून येणे असेही होते. घरातल्या कपाटात मग चिप्सचे पॅकेट, आयते नाष्ट्याचे प्रकार, मॅगी, …..वगैरे ठासून भरले जाते. आठवड्यातले दोन-तीन दिवस बाहेर खाल्ल्यावर कधीतरी घरात अन्न शिजवावे लागतेच. रोज रोज बाहेरचे अस्वच्छ भेसळयुक्त खाल्लं तर आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य राहू शकत नाही. (यावर पण लिहिणारच आहे पण ते पुढील लेखात.) पण समजा कामाचे तास खूपच जास्त आहेत शिवाय घरापर्यंतचा प्रवासही दमवणारा असला तर मग पर्याय काय? तर आपण पाहतो की स्वयंपाकाला आणि इतर घर कामाला मदतनीस ठेवला जातो. निदान घरी आल्यावर घर टापटीप तरी दिसेल आणि घरात शिजवलेलं अन्न तरी खायला मिळेल हा त्यामागचा उद्देश. हे झालं सवडीशास्त्र. माणसाला समजा तीन वेळा भूक लागते. सकाळी घराबाहेर पडताना काहीतरी कोरडा, आणून ठेवलेला नाष्टा तो करून घेतो. दुपारी कंपनीच्या कॅन्टीन मधलेच मसालेदार जेवण गोड मानून घेतो. पण रात्री घरी आल्यावर सुद्धा कुणा परक्याच्या हातचं खायची वेळ त्या दोघांवर आली तर मग ज्या पोटासाठी हे कमवायचे आहे त्या पोटाचे समाधान होतें का? मस्त मऊ मऊ लुसलुशीत इंद्रायणीचा गरम गरम वाफाळता भात, त्यावर घरचे तूप, पिवळ धम्मक वरण, एक लिंबाची फोड नाही तर लोणचं तरी… किती सुख आहे या जेवणात? आपल्या लहानपणी आईने ताटात कालवून दिलेला असा वरण-भात कुणाला आठवत नसेल बरं? का आवडत असेल तो तिच्या हातचा वरण-भात? का आपण म्हणतो की आज कालच्या अन्नाला चवच नाही? कारण एकच आहे, तो स्वयंपाक करणारे हात आईचे होते, काकूचे होते, आजीचे होते, मामीचे होते. त्याच्यात ठासून ठासून प्रेम आणि फक्त प्रेमच भरलं होतं. तिच्या हातच्या पोळ्या, आमटी, अगदी साधे पिठलं भाकरी सुद्धा मन तृप्त करत होते. कारण जे हात स्वयंपाकात गुंतलेले होते ते कमर्शियल नव्हते. कुठलाही पदार्थ त्यांनी केला तरी त्याची चव जिभेवर रेंगाळत होती. त्यांच्या मनात एकच भावना होती ती म्हणजे आपल्या माणसाचे पोट भरावे, मन भरावे आणि त्यांनी तृप्तीची ढेकर द्यावी, त्यांचे आरोग्य चांगले राहावे.

एखादी महिन्याच्या पगारावर पोळ्या लाटून देणारी बाई आल्या आल्या काय विचारते.. आज पोळ्या किती आणि भाकरी किती सांगा बाई; बरोबर ना? भले ती स्नान करूनच येत असेल, आल्यावर हात पाय स्वच्छ धुऊन कामाला लागत असेल ओटा धुऊन घेत असेल…. सगळं मान्य आहे पण तिला असं थोडीच वाटणार आहे की तुम्ही पोटभर जेवावं? तुमचे आरोग्य चांगले राहावे? तिच्या डोक्यात असतं, यांच्या दहा पोळ्या आवरून पुढच्या चार घरचे काम झालं की मग घरी जाईन माझी लेकरं तोवर उपाशीपोटी इकडे तिकडे काही बाई करत असतील किंवा खेळत असतील त्यांच्या घरात एवढी माल-मसाले, दूध दुभतं, दही ताक आणि माझ्या कच्च्या बच्च्यानच्या तोंडात दुपारचे दोन वाजले तरी अन्नाचा कण नाही…. असावे ना असेच विचार? हे मी जनरल लिहिले आहे. थोड्याफार फरकाने असंच चित्र असावं. त्यात त्या पोळी वाल्या बाईचा काहीच दोष नाही. मनुष्य स्वभावच आहे तो. तुलना तर होणारच आणि हेच तिच्या मनातले विचार नकळतपणे ती बनवत असलेल्या स्वयंपाकात संप्रेषित होणार आणि तेच अन्नं आपण रोज पोटात ढकलणार. तिला परत जाताना कालच्या उरलेल्या पोळ्या घेऊन जा म्हणणार. आता तुम्हीच सांगा कसं आपलं पोट आणि मन समाधानाने तृप्त होईल मग? का बरे वरचेवर आपण आजारी पडणार नाही? अन्नावरील वासना उडाल्यासारखं का बर होत असेल आज-काल? ही सगळी आपल्याला मिळालेली म्हणा किंवा आपण ओढवून घेतलेली आर्थिक समृद्धीची फळं आहेत.

यावर काहीच उपाय नाही का तर आहे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे घरातल्या प्रत्येक सदस्याने स्वयंपाकाच्या कामातला आपला वाटा ठरवून घ्यायचा किंवा उचलायचा तरी रोज घरात स्वयंपाक बनवून जेऊ घ**** या कामात प्रचंड प्रमाणात ऊर्जा कामाची आखणी पूर्वतयारी नियोजन इत्यादी अनेक गोष्टींचा कस लागत असतो आता इतकी वर्ष हे काम न सांगताच वार्ता घरातल्या स्त्रिया करत होत्या. पण काळ बदलला म्हणून फक्त त्या स्त्रीला अशा कामासाठी वेळ आणि ऊर्जा पुरेलच असे नाही.म्हणून पुरुषांनी पण फक्त बाहेरचे आणून दिले की संपले माझे काम असे न म्हणता घरातला आपला वावर अधिकाधिक स्वयंपाकाच्या दृष्टीने उपयोगी कसा होईल ते बघावेच लागेल. वाटल्यास भाज्या चिरणे, धुऊन देणे, दळण करणे आणणे, किराणा सामान वगैरे गोष्टींसाठी
कामवाल्या बाईची मदत घेणे ठीक आहे,पण मुख्य स्वयंपाक आपल्याच हातानं व्हायला हवा तरच अन्नपूर्णा देवी प्रसन्न होईल. (घरची अन्नपूर्णा फक्त स्त्रीच असते असे नाही,पुरूषही असतात हल्ली.) तेव्हा जेवल्यावर अन्नपूर्णा सुखी भवं! म्हणायला विसरू नका आणि थोडंफार कृतज्ञही रहा. म्हणजे त्यांच्या श्रमालाही प्रतिष्ठा प्राप्त होईल.

आणि हो, स्त्री मुक्ती वाल्यांनी आम्हीच का पोळ्या लाटू वगैरे रडगाणी घेऊन येऊ नका हं. आजकाल खूपशा तरूण मुलांना मी सगळा स्वयंपाक व्यवस्थित करताना बघतेय. आणि बऱ्याच मुलींना येत नाही हे देखील दिसतंय. आपल्या मुलाला आणि मुलीला सुद्धा स्वतःपुरते का होईना करून खायला शिकवा. कोरोनानं तेवढा धडा तर नक्कीच दिलाय. आयुष्यभर कोणी मेस लावू शकत नाही, हॉटेलींग करू शकत नाही किंवा बाईच्या हातचं खाऊ शकत नाही. या तीनही गोष्टी गरज पडेल तिथं आणि तेवढ्याच वापराव्या लागतात. आजारी असेल, पाहुणे आहेत, कार्यक्रम आहे…. वगैरे वगैरे. आणि फार स्वयंपाकात निष्णात करायची गरज नाही पण वरण भाताचा कुकर लावणे, चार-पाच आवडीच्या भाज्यांचे टेक्निक, पोळ्या करता येणे एवढी बेसिक शिकवण तरी गरजेचीच आहे. हो, मुलींना मुलांबरोबरची वागणूक देण्याच्या नादात काही अतिरेकी आया मुलींना काहीच काम लावत नाहीत. त्यांना हे कळत नाही की मुलगा असो वा मुलगी आपण त्यांचे असले फाजील लाड करून त्यांचंच नुकसान करतोय. बरं येतच नसेल करता तरी युट्युबवर बघून आज काल कोणीही पोटभरीचे पौष्टिक पदार्थ करू शकतोच. त्या बाबतीत हा काळ सुवर्णकाळ आहे. तेव्हा घरचं ताजं खाऊन कोणीही आरोग्यपूर्ण जीवनशैली कमवू शकतो, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.

अंजली दीक्षित

संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा