You are currently viewing नाबर प्रशालेच्या स्कूल बस चे उद्घाटन उत्साहात

नाबर प्रशालेच्या स्कूल बस चे उद्घाटन उत्साहात

बांदा

श्री मंगेश रघुनाथ कामत चारिटेबल ट्रस्ट मुंबईची व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा ही प्रशाला गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. केवळ शिक्षण देणे हेच प्रशालेच काम नव्हे तर त्यासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही शाळा सतत प्रयत्नशील असते.गेल्या वर्षीपासून आयसीएससी सीबीएससी आणि महाराष्ट्र शासन यांचा एकत्रित अभ्यासक्रम डिजिटल अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये सुरू करण्यात आला. डिजिटल क्लासरूम अत्याधुनिक सुविधा नियुक्त संगणक कक्ष कलादालन यांनी सुसज्ज अशी ही प्रशाला आहे. अगदी माफक दरात विद्यार्थ्यांना उच्च आणि उत्तम शिक्षण मिळावे यासाठी ही शाळा नेहमीच प्रयत्नशील आहे.उच्च दर्जाचे शिक्षण खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी या शाळेचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि म्हणूनच आणखी एक पाऊल पुढे टाकून या शाळेने विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.शाळेने खास प्रशालेची स्कूल बस विकत घेतली आहे जेणेकरून लांबच्या विद्यार्थ्यांना प्रवास करणे सुखकर होईल आणि या प्रशालेमध्ये प्रवेश घेऊन आपले भवितव्य उज्वल करतील यासाठी हा प्रशालेचा व संस्थाचालकांचा प्रयत्न आहे.

शनिवार दिनांक 29 एप्रिल रोजी संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री मंगेश कामत यांच्या हस्ते स्कूल बसचे उद्घाटन करण्यात आले. बांदा गावातील अनेक लोकांचा यासाठी आर्थिक हातभार लागला. लवकरच जून महिन्यापूर्वी प्रशालेचे दुसरी बस देखील उपलब्ध होणार आहे.प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावणारे सर्व शाळा प्रेमी, ग्रामस्थ,पालक विद्यार्थी या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा