You are currently viewing ओवळीये येथे शेतकऱ्यांचा डोक्यात दगड घालून खून

ओवळीये येथे शेतकऱ्यांचा डोक्यात दगड घालून खून

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे शेतात असलेल्या शेत मांगरालगत शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लवू रामा सावंत (५५, रा. ओवळीये वरचीवाडी ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मयत लवू सावंत हे आपल्या शेतात असणाऱ्या मांगरात रात्री झोपले होते. सकाळी त्यांचा भाऊ शेतात गेला असता त्याला भाऊ मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. याबाबतची खबर ओवळीये पोलीस पाटील यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सहा. पोलीस निरीक्षक यशवंते, पोलीस हवालदार दत्ता देसाई आदी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू आहे. सदरचा खून हा जमिनीच्या वादातून घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपचे आंबोली तालुका मंडळ अध्यक्ष तथा माजी सभापती रवी मडगावकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा