You are currently viewing फ.रा. प्रतिष्ठान आदर्श गाव केरचा पुरस्कार वितरण सोहळा उद्या

फ.रा. प्रतिष्ठान आदर्श गाव केरचा पुरस्कार वितरण सोहळा उद्या

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा, ह.भं.प. धर्मराज हंडे यांचे होणार “शिवचरित्रावर व्याख्यान

तर पुरस्कार सोहळ्यांनंतर दत्तमाऊली दशावतार मंडळ यांचा “कुक्कुटेश्वर महिमा” हा नाट्यप्रयोग

दोडामार्ग

आदर्श शिक्षक फक्रोजीराव देसाई यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या फ.रा. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम उद्या २ मे रोजी होणार आहे. हा पुरस्कार सोहळा पुणे येथील प्रसिद्ध शिवशंभू चरित्र व्याख्याते ह.भ.प. धर्मराज हांडे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री देव पूर्वाचारी रंगमंच,केर येथे होणार आहे.

यानिमित्त सकाळी प्रतिमापूजन, सत्यनारायण महापूजा, सत्यनारायण आरती, महा प्रसाद, हळदीकुंकू समारंभ तर संध्या. ७ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. तद्नंतर ह.भ.प. धर्मराज हांडे महाराज यांचे शिवचरित्रावर प्रर्बोधनात्मक व्याख्यान त्यांनतर श्री दत्त माऊली लोककला प्रशिक्षण व दशावतार मंडळाचा “कुक्कुटेश्वर महिमा” हा नाट्य प्रयोग होणार आहे.

तरी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन फ.रा.प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रेमानंद देसाई व संयोजक युवाशक्ती, महापुरुष, अवाटवाडी व स्टार युवक मंडळ, आदर्श गाव केर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा