कणकवली मतदारसंघातील विद्यार्थिनींसाठीचा उपक्रम
विद्यार्थिनींकडून उपक्रमाबद्दल राणेंचे आभार व्यक्त
कणकवली
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदार संघातील प्राथमिक शाळांमधील गरजू विद्यार्थिनींना शाळेमध्ये जाण्यासाठी मोफत सायकल ते वाटप करण्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली होती. या घोषणेच्या दुसऱ्या टप्याची आज पूर्तता करण्यात आली. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या टप्प्यातील सायकलचे वाटप झाल्यानंतर आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील सायकलचे वितरण आज करण्यात आले.
या प्रसंगी माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सरपंच संदीप मेस्त्री, तेजस लोकरे, समीर प्रभूगावकर, आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी या विद्यार्थिनींना सायकल वितरण करत असताना विद्यार्थिनींची शाळेमध्ये जाण्याची गैरसोयी दूर व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचा पुनरुच्चार केला.