You are currently viewing सावंतवाडीतील लोकअदालतीमध्ये १२३ प्रकरणे निकाली…

सावंतवाडीतील लोकअदालतीमध्ये १२३ प्रकरणे निकाली…

सावंतवाडी

येथील तालुका विधी सेवा समिती व वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी १२३ प्रकरणे सामजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यातून रु. १४,२२,७८२ रूपये वसुल करणेत आली. सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर, सह दिवाणी न्यायाधीश, डी. बी. सुतार यांच्या उपस्थितीत हे राष्ट्रीय लोकअदालत झाले.
यावेळी वकिल संघटना सावंतवाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड. नीता सावंत -कविटकर व पॅनेल समिती सदस्य अ‍ॅड. जी. जी. बांदेकर उपस्थित होते. या लोक न्यायालयात ६९१ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८२ प्रकरणे निकाली होवून रु ४,८६,९४१ रूपये रक्कम वसूल झाली. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ४९८ ठेवण्यात आली. त्यापैकी ४१ प्रकरणे निकाली होवून रु ९,३५,८४१ रूपये रक्कम वसूल झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा