You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोडामार्ग तालुका महिला अध्यक्ष मनीषा गवस यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोडामार्ग तालुका महिला अध्यक्ष मनीषा गवस यांचा शिवसेनेत प्रवेश

दोडामार्ग

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोडामार्ग तालुका महिला अध्यक्ष मनीषा मनोहर गवस यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री दिपक केसरकर यांनी सौ. गवस यांची शिवसेना महिला उपजिल्हा संघटक पदी नियुक्ती केली. सौ गवस या मेढे येथील आहेत.
सावंतवाडी येथे गुरुवारी शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकारिणीचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटक ॲड. नीता सावंत, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, महिला तालुका संघटक चेतना गडेकर यांसहीत उपतालुकाप्रमुख बाबाजी देसाई, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, तालुका संघटक गोपाळ गवस, यांसह तिलकांचन गवस सानवी गवस, अश्विनी शिरोडकर, लक्ष्मी करमळकर आणि सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यांचे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दोडामार्ग महिला शहर प्रमुखपदी शीतल हरमलकर, महिला उपशहर संघटक पदी राधिका गडेकर, सासोली महिला उपविभाग संघटक पदी करुणा मोर्लेकर, सासोली महिला शाखा संघटक पदी अनुष्का गवस, साटेली-भेडशी शाखा संघटक पदी शेफाली टोपले, आंबडगाव शाखा संघटकपदी स्नेहा गवस, गिरोडे शाखा संघटक पदी अनिता गवस, माटणे शाखा संघटक पदी रुक्मिणी नाईक, उपशाखा संघटक पदी सफोरा शेख आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा