मार्गेश्वर क्रीडा मंडळ हडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन ; १, २ मे रोजी विविध कार्यक्रम
मालवण
मार्गेश्वर क्रीडा मंडळ हंडी ता. मालवण आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या वतीने १ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नं. २ हडी जठारवाडी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरात सहभागी होण्यासाठी संतोष आमरे ८४५९५७१००९, नागेश कावले ९४०३५५९०४१, सौ. आर्या गावकर ९४२३३२१२३०, सौ. शिल्पा खोत ९३२६४७७७०७, रुपेश आमरे ९१३७०७३७०७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१ आणि २ मे रोजी विविध कार्यक्रम
श्री मागेश्वर क्रीडा मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे मंगळवार दि. २ मे रोजी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. रक्तदान शिबीर, दुपारी ३ ते ६ महीला व मुलांसाठी पारंपारीक खेळ, २ मे रोजी सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा प्रारंभ, दुपारी १२ वा. तिर्थप्रसाद व महाप्रसाद प्रारंभ, महीलासांठी हळदी-कुंकू, सायंकाळी ६ ते ७.३० वा. स्थानिक सुस्वर भजने, रात्री ७.३० ते ९.३० बुवा. कु. तारीणी विजय कवटकर (मुंबई) हिचे सुस्वर भजन, रात्री ९.३० ते १० वा. मान्यवरांचे सन्मान, रात्री १०.३० श्री कलेश्वर दशावतार नाटयमंडळ यांचे ट्रिकसीनयुक्त “अजिंक्यतारा भाग १” हे दशावतारी नाटक होणार आहे.