सिंधुदुर्ग :
महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन (मालसा) ही विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारी संघटना आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी संघटनेने अनेक उपक्रम राबविले आहेत. विविध आंदोलनाच्या माध्यमातून विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभे राहून विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. मालसा प्रतिनिधी नियुक्ती वर्ष 2022-2023 साठी मुलाखती झाल्या त्या मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा/ कॉलेजचा पदविस्तार केला. त्या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा सचिव विशाल चव्हाण सर तसेच, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे अध्यक्ष दिपक सर उपस्थित होते. महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशनचे यांच्या संयुक्त विद्यमाने नियुक्त्या पुढील प्रमाणे अनिल तळगूळकर जिल्हा सहसचिव, प्राची चव्हाण जिल्हा संघटक, ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज अध्यक्ष, शिल्पाजा सावंत, व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज संघटक, गणेश कदम व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज
Cet – cell सदस्य, किशोर खरात, Spk लॉ कॉलेज सहसंघटक म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
भविष्यात विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी अधिक ताकतीने काम करणार असल्याचे आणि विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे संपूर्ण कार्यकारणीने याप्रसंगी सांगितले. मालसा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक बेदरे, उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, सचिव प्रवीण कर्डिले, सहसचिव दीपक घटकार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गणपत सुरडकर, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, जिल्हा सचिव विशाल चव्हाण, तुषार राऊत राज्य संघटक, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सदर कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.