You are currently viewing श्री जयराम धोंगडे यांनी डॉ.चंद्रशेखर फणसळकर यांनी केलेली व्यक्ती ओळख

श्री जयराम धोंगडे यांनी डॉ.चंद्रशेखर फणसळकर यांनी केलेली व्यक्ती ओळख

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी गझलकार श्री जयराम धोंगडे यांनी डॉ.चंद्रशेखर फणसळकर यांनी केलेली व्यक्ती ओळख*

डॉ.चंद्रशेखर फळसणकर [एमबीबीएस एम.डी. (मेडिसिन)] हे पुण्यातील एक प्रथितयश निष्णात डॉक्टर ! ते महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनच्या ‘जोशी हॉस्पिटल’ आणि ‘रत्ना मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये कार्यरत आहेत. एक निष्णात फिजिशियन म्हणून अमेरिका, यु.के., ऑस्ट्रावा आणि ओपावा, जर्मनी सारख्या देशात ICU Observer म्हणून त्यांनी भेटी दिल्या.

डॉ. चंद्रकांत फणसळकरांचा वैद्यकीय व्यावसायिक म्हणून लौकिक आहेच परंतु त्यांनी साहित्यिक, नाटककार, पटकथाकार म्हणून आपली वेगळी ओळख आणि छाप निर्माण केली. त्यांचे Tax Free, खेळीमेळी– दोन अंकी नाटक, ‘वा गुरु’ हे दोन अंकी नाटक दिलीप प्रभावळकर सारख्या दिग्गज नटाने मराठी रंगभूमीवर गाजवलं… आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रसिद्ध नाटककार स्व. श्री विजय तेंडूलकर यांच्या “त्याची पाचवी स्त्री’ या नाटकाचा डॉ.फळसणकरांनी ‘त्याची पाचवी’ असा मराठी अनुवाद केला आहे.

जर्मन भाषिक देशांमध्ये थेट रंगमंचावर, T.V., रेडिओ, चित्रपट, सीडी, कॅसेट इत्यादीं माध्यमातून त्यांची नाटके प्रदर्शित करण्यात आली. त्यांच्या Tax Free या नाटकाचे इटालियन भाषेत भाषांतर कॅसिनो विद्यापीठ, इटलीचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक गॅब्रिएल पूल यांनी केले आहे. अमेरिकन नाटककार मार्शा नॉर्मन यांच्या पुलित्झर विजेते इंग्रजी नाटक ‘नाईट मदर’ चे मराठी रुपांतर ‘येते आई’ या शीर्षकाखाली त्यांनी केले.

त्यांनी इ.स. २००० मध्ये ‘अस्तित्व’ या वैशिष्ठ्यपूर्ण द्विभाषिक चित्रपटासाठी मराठी संवाद लेखन केले आहे. एन्नाडू दूरदर्शन, हैदराबादच्या मराठी मालिका “वर्तमान” आणि “आपले घर” साठी त्यांनी संवादलेखन केले आहे. गेल्या २५-३० वर्षापासून, वरील सर्व नाटकांचे सादरीकरण त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात आणि परदेशात केले जात आहे. त्यांच्या मूळ इंग्रजी नाटकांचे हिंदी, गुजराथी, कन्नड आणि संस्कृतमध्ये अनुवाद केले गेले आहेत.

“परवा आमचा पोपट वरला” या विनोदी एकपात्री प्रयोगाचे लेखन त्यांनी केले. प्रख्यात अभिनेते- दिग्दर्शक अतुल पेठे यांन हा प्रयोग गाजविला.

अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या साहित्यिक डॉक्टरांची आज ‘विश्व इन्स्टिट्यूट’ येथे आमचे संचालक डॉ.उमेश भालेराव दादांमुळे भेट झाली. त्यांना माझा नुकताच प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह ‘तिपेडी’ भेट दिला… वाचून प्रतिक्रिया कळवीन म्हणाले… खूप खूप आनंद वाटतो.

जयराम धोंगडे
प्रशासक, विश्व इन्स्टिट्यूट
नांदेड

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा