मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मुंबई हे अनेक नामांकित एक पडदा चित्रपटगृहांचे माहेरघर आहे. या एक पडदा चित्रपटगृहांमध्ये कित्येक सुपरिचित सिनेमांचे जुन्या दिवसांतील सर्वात मोठे प्रीमियर पाहिले आहेत आणि ते प्रत्येक सिनेमा पाहणाऱ्याच्या आठवणीचा भाग आहेत. गेल्या काही वर्षांत, मल्टिप्लेक्सने एक पडदा चित्रपटगृहांचा व्यवसाय ताब्यात घेतल्याने, चंदन सिनेमा, इम्पिरियल सिनेमा, रॉयल सिनेमा, नॉव्हेल्टी सिनेमा, ताज टॉकीजसह अनेक एक पडदा चित्रपटगृह बंद पडली आहेत. इरॉस थिएटर हे २०१७ मध्ये बंद पडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांपैकी एक आहे. चित्रपटगृहाची इमारत मॉलमध्ये पुनर्निर्मित करण्यासाठी तोडली जात आहे.
मुंबईतील चर्चगेट येथील गजबजलेल्या रस्त्यावर इरॉस थिएटर होते. इरॉस सिनेमाची १,२०४ लोकांची आसनक्षमता होती. या थिएटरची रचना वास्तुविशारद शोराबजी भेदवार यांनी १९३८ च्या सुरुवातीला केली होती. हे मुंबईतील सर्वात आलिशान सिनेमागृहांपैकी एक मानले जाते. ही इमारत आर्ट डेको आर्किटेक्चरल शैलीमध्ये बांधली गेली होती, जी बॉम्बे डेको म्हणून ओळखली जात होती. पायाभूत सुविधांवर गॉथिक आणि व्हिक्टोरियन शैलीचे वर्चस्व असलेल्या भागात, बॉम्बे डेको शैली नेहमीपेक्षा वेगळी मानली जात होती. आग्र्याचा लाल दगडाचा वापर आणि पांढर्या क्रीम रंगाचे रंगकाम यामुळे या वास्तुला एक सुंदर बॉम्बे डेको देखावा दिला. इमारतीचा आकार टायर्ड वेडिंग केक सारखा होता, ज्याचा अर्धगोलाकार मनोरा क्षितिजापर्यंत पोहोचला होता.
इरॉसची वास्तू जेव्हा उभारली गेली तेव्हा अतिशय आकर्षक आणि आधुनिक होती आणि त्यामुळे ती हेरिटेज इमारतींमध्ये गणली गेली. ही वास्तू रंगीत आणि हवेशीर होती. क्रॉस वेंटिलेशनचा एक आदर्श नमूना म्हणूनही नावलौकिक होता.
चित्रपट निर्माते अपूर्वा असरानी म्हणाले, “इरॉस थिएटर १९३८मध्ये उभारलेला दक्षिण मुंबईच्या मुकूटातला हा अनमोल वारसा पाडला जाताना बघून ह्रदयला अत्यंत वेदना होत आहेत. जिथे मी कॉलेज बंक करून सिनेमे पाहिले होते. याच ठिकाणी मी माझ्या पहिल्या डेटला गेलो होतो आणि जिथे माझा पहिला चित्रपट ‘सत्या’ १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. मुंबई आपल्या अलौकिक अनमोल हेरिटेज वास्तूंचे जतन करू शकत नाही याचे अत्यंत वाईट वाटते.”
वीर दास यांनी तिथे “रंग दे बसंती” सिनेमा पाहिला तेव्हा ते सीएनबीसीमध्ये काम करत होते. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सिनेमासाठी स्वतःला वाहून घेतले.
विवेक अग्निहोत्री ट्विट करतात “प्रत्येक वेळी एक पडदा चित्रपटगृह पाडलं जात असताना माझ्या आठवणींचा एक तुकडा निखळून जातो. माझे ४ चित्रपट येथे प्रदर्शित झाले. शेकडो चित्रपट पाहिले, खास जागतिक चित्रपटांचे मॅटिनी शो देखील पाहिले त्यानंतर मला ह्या व्यवसायातली व्यावहारिकता आणि व्यवहार्यता समजली.”
*सिनेमागृह बंद पडण्याचं कारण…*
इरॉस सिनेमा हे एकेकाळी मुंबईतील सर्वात वैभवशाली पायाभूत सुविधांपैकी एक चित्रपटगृह होते. हे चित्रपटगृह कंबाटा कुटुंबाच्या मालकीचे आहे, जे कंबाटा एव्हिएशन आणि बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिस ही विमान कंपनी चालवते. २०१७ मध्ये थकबाकी न दिल्याने आणि त्याबाबत कामगार संघटनेने गुन्हा दाखल केल्यानंतर इमारत सील करण्यात आली होती.
कंबाटा एअरवेज कंपनी देशभरातील काही विमानतळांवर जमिनीवरील सेवा पुरवत असे. सुमारे हजार कर्मचाऱ्यांचे पगार न देण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. कंपनीने मुंबई आणि दिल्लीतील कामकाज बंद केले आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरले. थिएटरच्या मुख्य प्रवेशद्वारावर चिकटवलेल्या नोटीसमध्ये सुमारे चार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सील करण्यात येत असल्याचे लिहिले होते.
सीलचे आदेश लागल्यानंतर पीडित भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतली. आपल्या याचिकेत दावा केला की या इमारतीमध्ये कंबाटा एव्हिएशनची कोणतीही मालमत्ता नाही आणि त्यामुळे ती आणि इतर कार्यालये सील करणे बेकायदेशीर आहे आणि प्रलंबित थकबाकीशी काहीही संबंध नसलेल्या भाडेकरूंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इरॉस व्यवस्थापनानेही आपल्या याचिकेत दावा केला की ते इमारतीत फक्त भाडेकरू आहेत आणि ते इमारतीच्या मालकांना वेळेवर भाडे देत आहेत आणि थिएटर सील करून कलेक्टरने इरॉसचे नुकसान केले आहे. त्यावर इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या गॅलेक्सी एअरवेजच्या कंबाटा एअरवेजच्या एका उपकंपनीला न्यायालयाने त्यांची कार्यालये खुली करण्याचे आदेश दिल्याने काहीसा दिलासा मिळाला.
*संवाद मीडिया*
*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*
*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*
*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*
*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*
*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*
*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*
*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*
*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*
*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*
*जाहिरात लिंक*
———————————————-