कुडाळ
संकरीत बियाण्यांचे दुष्परिणाम, वाढणाऱ्या किंमती, कंपनी वर अवलंबून असणारा शेतकरी, त्यामुळे परावलंबी बनलेला शेतकरी हे दुष्टचक्र आहे.यातून शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी देशी बियाण्यांचा वापर अनिवार्य आहे. पण आज शेतकऱ्याकडे देशी बियाणे उपलब्ध नाहीत. यासाठी भारतीय किसान संघ, सिंधुदूर्ग च्या वतीने देशी बियाणे बँक तयार करण्यात येत आहे.
या *देशी बियाणे बँक चे उद्घाटन भा. की. सं.चे महाराष्ट्र प्रांत महामंत्री मान. श्री. मदनजी देशपांडे यांच्या हस्ते श्री सूर्यकांत कुंभार, नेरुर देऊळवाडा, शिरसोस शाळेजवळ तेथे दि.३०एप्रिल रोजी ३वा.होणार आहे.*
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भा की संघाचे जिल्हाध्यक्ष श्री तानाजी सावंत यांनी केले आहे.