You are currently viewing तळकट शाळा नं.१ शतक महोत्सव निमित्त ६ मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

तळकट शाळा नं.१ शतक महोत्सव निमित्त ६ मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

दोडामार्ग

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळकट नं.१ शतक महोत्सव समिती व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा-दोडामार्ग तर्फे शनिवार दि.६ मे रोजी सकाळी १० वाजता जि.प. प्राथमिक शाळा तळकट नं १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा मेडिकल काँलेज, बांबोळी येथील आरोग्य सेवक उपस्थित राहणार आहेत. इच्छुक रक्तदात्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी नावनोंदणी साठी गोविंद गवस 9423314801, दिपक मळीक 9029161515, सुरेंद्र सावंत 9404939383, भूषण सावंत 930978684, वैभव रेडकर 7083572653, संतोष सातार्डेकर 9403557705 यांना संपर्क साधावा. तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांनी रक्तदान शिबीरास उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष – दुर्गाराम गवस, सचिव – मनोहर झेंडे, खजिनदार – रामदास देसाई, कार्याध्यक्ष – दिपक मळीक, तसेच सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सदस्य गोविंद गवस आणि सरपंच सुरेंद्र सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा