कुडाळ
डिगस गावातील विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेतील कुडाळ एस टी महामंडळाने बस फेऱ्या तत्काळ सुरू करण्याची मागणी आज माजी जि. प .सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी शाळेच्या शिष्ट मंडळा सह व डिगस ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी कुडाळ एस टी महामंडळाचे ट्रॅफिक इन्स्पेक्टर राऊळ यांना निवेदन दिले. यावेळी डिगस सरपंच पुनम पवार, उपसरपंच मनोज पाताडे, मुख्याध्यापक दीपक आळवे, एस. पी. प्रभाळे , संजय वेतूरेकर , अनुजा सावंत, अश्विनी वंजारे , रमेश कांबळे प्रणय राणे, दीपक कदम आदी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी कुडाळ एसटी महामंडळाने लवकरच बसेस सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिले डीगस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दिव्यांगाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती .या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कुडाळ ,पणदूर, ते सूर्वेवाडी, चोरगेवाडी , मोठी घाणेचीवाडी, टेंबवाडी,ते पाताडेवाडी, करल्याचेगाळू, परबवाडी, सातरेवाडी, जाधववाडी, ते हिंदेवाडी, तसेच मागे फिरून जाधववाडी , तळेवाडी, कारिवणे टेंब, लिंग मंदिर मार्गे पणदुर असा मार्ग ठेवण्यात यावा अशी मागणी एस टी महामंडळाकडे केली . डिगस गावातील विद्यार्थ्यांची एस टी बस पासून गैरसोय होऊ नये यासाठी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांची शाळेच्या शिक्षिका अनुजा सावंत यांनी भेट घेत निवेदन ही दिले होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी याबाबत आपण पाठपुरावा करून बसेस लवकरच सोडले जातील असा ठाम विश्वास व्यक्त केला.